लातुरात दोन तरुणी करत आहेत मोकाट कुत्र्यांना अन्नदान

लातुरात दोन तरुणी करत आहेत मोकाट कुत्र्यांना अन्नदान
dog food

लातूर - लॉकडाऊनमूळ Lockdown गोरगरिबांच्या तसेच रस्त्यावर राहून जीवन जगणाऱ्या गरिबांचा प्रश्न ऐरणीवर येताच शासनासह अनेक सामाजिक संस्थांनी Social institutions गरिबांना अन्नदान Food donation करून त्यांच्या भुकेचा प्रश्न मार्गी लावला . मात्र शहरात मोकाटपणे फिरणाऱ्या कुत्र्यांचा Dogs वाली कोण ? हा प्रश्न पडताच दोन तरुणींनी कुत्र्यांना अन्नदान करण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे .  In Latur two young women are donating food to street dogs

लातूर Latur शहर महानगरपालिकेत Municipal Corporation कामाला असलेल्या या तरुणीचे नाव तन्मयी दिक्षित Tanmaye Dixit आणि सोनम भागवत Sonam Bhagwat असे आहे. पालिकेत कामाला असल्यानं शहरातल्या एकूण परिस्थितीचा यांना चांगला अंदाज आहे आणि यामुळंच या दोन तरुणींना ही कल्पना सुचली .

हे देखील पहा -

गोरगरीब जनतेच्या तर मदतीला अनेक हाथ पुढे आले, मात्र शहरातल्या हॉटेल्स आणि चायनीज सेंटरच्या भरवश्यावर अवलंबून असलेली शहरातले कुत्री आपलं पोट कसं भरणार हा प्रश्न त्यांना पडला, आणि त्यांनी कुत्र्यांचं खाद्य स्वखर्चानं खरेदी करून संपूर्ण शहरात फिरून कुत्र्यांना वाटप केलं .  In Latur two young women are donating food to street dogs

या दोन्ही तरुणींच्या कार्याला अनेकांनी पाहिलं आणि त्यांना मदत देऊ केली, काहींनी अन्न धान्य स्वरूपात तर काहींनी आर्थिक स्वरूपात यामुळं या दोघांना आणखी नवं बळ मिळालं. त्यांच्या कार्याला प्रेरित होऊन आता हळूहळू ईतर तरुणही त्याच्यासोबत कामाला लागले आहेत . 

गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेलं हे अविरत अन्नदान कार्य यापुढेही संकटाच्या काळात सुरु ठेवण्याचा या दोन तरुणींचा मानस आहे . या दोन्ही तरुणींच्या धाडसी आणि अनोख्या कार्याला सलाम.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com