पहिली कोरोनाची लस ऑगस्टमध्ये येईल - रशियाचा दावा तर ऑक्सफर्डकडूनही दिलासादायक बातमी

पहिली कोरोनाची लस ऑगस्टमध्ये येईल - रशियाचा दावा तर ऑक्सफर्डकडूनही दिलासादायक बातमी

कोरोना प्रतिबंधक लस संशोधन आणि उत्पादनाच्या बाबतीत रशियाने आघाडी घेतलीय. जगातील पहिली कोरोना व्हॅक्सिन ऑगस्ट महिन्यात बाजारात येईल, असा दावा केल्यानंतर. 12 ऑगस्टपासून  कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणार असल्याची घोषणा रशियाने केलीय. कोरोना विषाणू प्रतिबंधक व्हॅक्सिनचे 3 कोटी डोस उत्पादित करण्याची योजना रशियाने आखली. यापैकी एक कोटी 70 लाख डोस अन्य देशांतून उत्पादित करवून घेतले जातील. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलेल्या व्हॅक्सिनची मानवी चाचणीही यशस्वी ठरलीय. तर भारतात भारत बायोटेक तसेच झायडस कॅडिला या औषध कंपन्यांकडून मानवी चाचण्या सुरू आहेत.

ब्रिटनमधूनही एक आनंदाची बातमी आलीय. ऑक्सफोर्ड विद्यापीठामध्ये चाललेल्या कोरोना लसीच्या मानवी चाचणीचे पहिला टप्पा यशस्वी झालाय. तर तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याची चाचणी सुरु आहे. हा टप्पा यशस्वी झाल्यास सप्टेंबरमध्ये ही लस जगभरात उपलब्ध होणार आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जेनर इन्स्टिट्यूटमध्ये कोरोनावरील लसीची मानवी चाचणी सुरु आहे. या चाचणीचा पहिला टप्पा यशस्वी झाला आहे. या टप्प्यात ही लस कोरोनाग्रस्तांच्या शरीरामध्ये अँटीबॉडी आणि टी बॉडीज सेल्स बनविण्यात यशस्वी ठरलीय.

दरम्यान, देशाची रुग्णसंख्या 10 लाखाच्या पार गेलीये. तर 25 हजारहून अधिक रुग्णांचा मृत्यू झालाय. गेल्या 24 तासांत देशात सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. तब्बल 34 हजार 956 नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशात गेल्या 6 दिवसांपासून सरासरी 25 ते 30 हजाराने रुग्णवाढ होते आहे. रुग्णवाढीमुळे आरोग्य यंत्रणेवरीलही ताण वाढलाय. दिलासादायक बाब म्हणजे एक्टीव रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येपेक्षा कमी आहे. सध्या देशात 3 लाख 42 हजार 473 एक्टीव रुग्ण आहेत. अशातच रशिया आणि ब्रिटनमधून लस आल्यास भरतासाठी फायदा होईल. आणि कोरोनारुपी राक्षसाचा नायनाट होईल. अशी आपण आशा करु शकतो.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com