video | बायकोच्या त्रासाला कंटाळले नवरे, म्हणे बायकोपासून वाचवा! वाचा पत्नीपीडित नवऱ्यांची आर्त हाक

video | बायकोच्या त्रासाला कंटाळले नवरे, म्हणे बायकोपासून वाचवा! वाचा पत्नीपीडित नवऱ्यांची आर्त हाक

पतीने पत्नीचा छळ केल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. पण, आता पत्नीने पतीला त्रास दिल्याच्या तक्रारी वाढल्यायत. असं काय झालं अचानक की पत्नी पत्नीला त्रास देतायत. नक्की काय आहेत कारणं तुम्हीच पाहा... 

...एरव्ही नवऱ्याने छळले म्हणून महिला तक्रारी करतात. पोलिसांत जाऊन मदत मागतात. पण आता पुरुषांचाही देखील छळ होऊ लागलाय. अगदी पोलिस ठाण्यात दाद मागण्याची वेळ या बिच्चाऱ्या पुरुषांवर आलीय. एक दोन नव्हे, तर औरंगाबादमधल्या 200 हून अधिक नवरोबांनी आपल्या पत्नीविरुद्ध भरोसा सेलमध्ये तक्रारी केल्यायत. खरं तर पीडित महिला आणि मुलांसाठी हा सेल सुरू करण्यात आला. पण तिथं आता बायकोच्या त्रासाला कंटाळलेल्या नवऱ्यांच्या तक्रारी वाढतायत. या तक्रारी नक्की काय पाहुयात...

  • पत्नीपीडित नवऱ्यांच्या तक्रारी काय?
  • माझी बायको माझा छळ करते, मला समजून घेत नाही
  • आईवडिलांसोबत राहायला नकार देते
  • मोबाईलच्या नादात संसाराकडं दुर्लक्ष होतंय
  •  
  •  सासरची मंडळी माझा छळ करतात, बायकोला नांदायला पाठवत नाही

 
यातल्या काही तक्रारी समुपदेशनानं सोडवण्यात पोलिसांना यश आलंय...काही प्रकरणात मात्र परिस्थिती काडीमोडापर्यंत पोहोचलीय....त्यामुळं पोलिसांना देखील मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्यावी लागतेय...

केवळ कायद्याचा दंडुका दाखवून सगळेच प्रश्न सुटत नाहीत...संसाराचा गाडा सुरळीत चालावा, यासाठी पोलिसांनाही सामोपचाराचा मध्यम मार्ग स्वीकारावा लागतो...पण पत्नी पीडित पुरुषांच्या वाढत्या तक्रारींमुळं पोलिसांचीही डोकेदुखी वाढलीय हे मात्र, नक्की...माधव सावरगावे साम टीव्ही औरंगाबाद

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com