रामभक्तांचा हिरमोड करणारी एक बातमी, मुस्लिम संघटनाच्या विरोधामुळे जाहिरातदारांचा हा निर्णय

रामभक्तांचा हिरमोड करणारी एक बातमी, मुस्लिम संघटनाच्या विरोधामुळे जाहिरातदारांचा हा निर्णय

अय़ोध्येत भूमिपूजनावेळी टाईम्स स्क्वेअरवर प्रभू श्रीरामांची प्रतिमा झळकणार होती, पण आता ही प्रतिमा झळकणार नाहीये.

जगभरातील प्रभू श्रीरामभक्तांचा हिरमोड होणार आहे कारण टाईम्स स्क्वेअरवर प्रभू श्रीरामांची प्रतिमा झळकणार नाहीये. न्यूयॉर्कमध्ये ५ ऑगस्टला १७ हजार फुटांच्या स्क्रीनवर प्रभू रामांची थ्री डी प्रतिमा झळकणार होती.  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडत असतानाच न्यूयॉर्कमध्ये ही प्रतिमा झळकणार होती. पण टाइम्स स्क्वेअरमधील बिलबोर्डची मालकी असणाऱ्या प्रमुख जाहिरातदार कंपनीने प्रभू रामांची प्रतिमा झळकवण्यासाठी नकार दिलाय. मुस्लीम समाजातील काही जणांनी आक्षेप घेतल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येतेय. यासंदर्भातील वृत्त क्लिरीयन इंडिया या वेबसाईटने दिलंय.

अमेरिकेतील काही मुस्लीम समाजासंदर्भात काम करणाऱ्या गटांनी टाइम्स स्क्वेअरवर जाहिराती करणाऱ्या ब्रॅण्डेड साइट्स या कंपनीकडे प्रभू रामांची प्रतिमा झळकावू नये अशी मागणी केली. या मागणीनंतरच कंपनीनं कॅम्पेन करण्यास नकार दिला आहे. टाइम्स स्क्वेअरवरील नॅसडॅकची स्क्रीन ही काही विशेष दिवसांच्या निमित्ताने रोषणाई करुन सजवली जाते. त्यासाठी ही स्क्रीन भाड्याने दिली जाते. जगभरातील विशेष दिवसांचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या टाइम्स स्क्वेअरवर ही स्क्रिन असल्याने तिला अधिक महत्व आहे. मात्र आता मुस्लीम समाजाने केलेल्या विरोधानंतर इथे प्रभू श्रीरामांची प्रतिमा झळकणार नाहीये. त्यामुळे श्रीरामभक्तांचा हिरमोड होणार हे नक्की. 
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com