VIDEO | आता भाजप फुटणार? पंकजा मुंडेंची नवी दिशा कोणती?

VIDEO | आता भाजप फुटणार? पंकजा मुंडेंची नवी दिशा कोणती?

भाजप नेत्या आणि माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे एका राजकीय भूकंपांच्या तयारीत आहेत. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून पंकजा मुंडेंनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवलीय. त्यामुळे पंकजांची नवी दिशा काय असेल? यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलंय.

हे सवाल उपस्थित झालेत पंकजा मुंडेच्या फेसबुक पोस्टमुळे...भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुकवरून एक पोस्ट करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिलीय.
या पोस्टमधून पंकजा मुंडे यांनी पुढच्या प्रवासाची राजकीय दिशा ठरवण्याबाबतचं भाष्य केलंय.  निवडणुकीतल्या पराभवानंत काही क्षणातच माध्यमांसमोर जाऊन मी तो स्वीकारला आणि परभावाची सर्व जवाबदारी माझी असल्याचं सांगितलं.
दुसऱ्याच दिवशी पार्टीच्या कोअर कमिटीच्या बैठकीस मी हजरही झाले. पाच वर्षे सत्तेच्या माध्यमातून तुमची सेवा केली. मुंडेसाहेबांनी एका क्षणात मला राजकारणात आणलं. मुंडेसाहेबांच्या पश्चात जनतेप्रती असलेली जबाबदारी म्हणून राजकारणात राहीले. आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे. आपण मला वेळ मागत आहात.. मी आपल्याला वेळ देणार आहे...आठ ते दहा दिवसांनंतर...पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे.


12 डिसेंबरला आपल्या गोपीनाथगडावर भेटू !

आता या पोस्टनंतर पंकजा मुंडेंच्या मनात नेमकं आहे तरी काय? यावरून राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढवले जातायेत. धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळात समवेश होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंसमोर राजकीय अस्तित्व टिकवण्याचं आव्हान असेल. कदाचित पंकजा शिवसेनेचा पर्याय स्विकारू शकतात अशीही एक चर्चा आहे. 

पंकजा मुंडे हा मराठवाड्यातील भाजपचा चेहरा आहे. मात्र सध्या पक्षात त्या अस्वस्थ आहेत. आता ही अस्वस्थता घालवण्यासाठी पक्षबदल हाच मार्ग असेल का, की आणखी काही...हे 12 डिसेंबरलाच स्पष्ट होईल. 

WEB TITLE -  PANKAJA MUNDE LEAVING BJP?

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com