SPECIAL | शिवसेनेचा ढाण्या वाघ! संजय राऊतांचा झुंजार बाणा ठरला सेनेसाठी निर्णायक...

SPECIAL | शिवसेनेचा ढाण्या वाघ! संजय राऊतांचा झुंजार बाणा ठरला सेनेसाठी निर्णायक...

शिवसेनेचा मुख्यमंत्री होतोय. पण शिवसेनेच्या सत्तासंघर्षात एक व्यक्ती अशी आहे जी शिवसेनेची कधी ढाल, शिवसेनेची धडाडणारी तोफ म्हणून एकटी खिंड लढवत होती... एकवेळ तर अशी आली की सत्तास्थापनेच्या चढाओढीत शिवसेनेची फजिती झाल्याची टीका सर्वच स्तरातून होऊ लागली. शिवसेनेच्या राजकीय इतिहासात कधी नाही आला असा अवघड काळ आला होता तेव्हा एक कट्टर शिवसैनिक, मुळचा हाडाचा असलेला पत्रकार शिवसेनेची ढाल बनून उभा राहिला. उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यात निधड्या छातीनं कुणी उभं राहिलं असेल तर अवघ्या महाराष्ट्रातील शिवसैनिकांच्या तोंडावर एकच नाव येतं.. ते म्हणजे संजय राऊत. शिवसेनेच्या या सत्तासंघर्षात एक वेळ अशी आली की राऊत थेट लीलावती रुग्णालयात दाखल झाले. पण तरीही त्यांची तलवार म्यान झाली नाही. कोशीश करने वालों की कभी हार नही होती, अशा ओळी त्यांनी हॉस्पिटलमधून ट्विट केल्याहो.. आम्ही बोलतोय. संजय राऊतांविषयीच.. पाहुयात संजय राऊत यांच्या झुंजार बाण्यावर प्रकाश टाकणारा एक स्पेशल रिपोर्ट

webtittle : Shiv Sena is becoming Chief Minister.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com