VIDEO | शिवसेनेचा हिंदुत्वाला राम राम?

VIDEO | शिवसेनेचा हिंदुत्वाला राम राम?

गर्व से कहो हम हिंदु है, असं म्हणणारी शिवसेना आता सेक्युलर झालीय. शिवसेनेकडून हिंदुत्वला कायमचा जय महाराष्ट्र करण्याबाबत सूचक विधान केलं गेलंय. नेमकं काय वादळ उठलंय या शब्दामुळे पाहूयात हा सविस्तर पंचनामा...

जहाल हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी शिवसेना आता सेक्युलर झालीय. हिंदुत्ववादी ओळख असणाऱ्या शिवसेनेनं आता हिंदुत्वाला राम राम ठोकलाय. सेक्युलर होण्याबाबत जाहीर विधान शिवसेनेकडून करण्यात आलंय. 'सेक्युलर' शब्द घटनेतच आहे, मग चर्चा काय करायची? असा सवाल शिवसेनेकडून विचारला गेलाय. महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार महाराष्ट्रात येणार हे निश्चित झालंय. काँग्रेस-राष्ट्रवादीसारख्या धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत जहाल हिंदुत्ववादी अशी ओळख असणाऱ्या शिवसेनेची आघाडी होतेय. राम मंदिराबाबत पहले मंदिर फिर सरकार म्हणणारी शिवसेना हिंदुत्वाबाबत नुसती मवाळ झाली नाहीये, तर काँग्रेस-राष्ट्रवादीसारखी सेक्युलरही झालीय. आता सामान्य शिवसैनिकांसह मतदार शिवसेनेच्या या बदलाला कसे स्वीकारतात हे पाहणं कुतूहलाचं ठरणार आहे.

WEB TITLE - IS SHIVSENA'S STRUCTURE CHANGED?

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com