GOOD NEWS! इंजिनिअर्ससाठी आनंदाची बातमी, लवकरच या मोठ्या कंपन्यांमध्ये होणार भरती

GOOD NEWS! इंजिनिअर्ससाठी आनंदाची बातमी, लवकरच या मोठ्या कंपन्यांमध्ये होणार भरती

आयटी इंजिनिअर्ससाठी एक आनंदाची बातमी, भारतातील आघाडीच्या सॉफ्टवेअर कंपन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रोमध्ये पुन्हा मोठी कर्मचारी भरती होणार आहे. कोरोनाच्या काळात झालेलं नुकसान भरुन काढण्यासाठी अतिरिक्त कामगारांची मागणी होतेय. देशात सध्या आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांचं प्रमाण सर्वात कमी म्हणजे 8.9 टक्के इतकं आहे.

“कंपनीच्या वाढीच्या अनुषंगाने कर्मचारी भरती होईल, अशी माहिती इन्फोसिसचे सीओओ यू. बी. प्रवीण राव यांनी दिलीय. तर विप्रोचे मनुष्यबळ विभागाचे प्रमुख सौरभ गोविल यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून दुसऱ्या सहामाहीत मोठी कर्मचारी भरती करण्याची आमची योजना असल्याचं त्यांनी सांगितलंय.

सॉफ्टवेअर क्षेत्रातील प्रसिध्द कंपन्या TCS, Infosys and Wipro आता पुन्हा मोठ्या संख्येने नोकरभरती करण्याची शक्यता आहे. कोरोनाचा प्रभाव उतरल्याने बाजारतील मागणीत काही प्रमाणात वाढ झाल्याने या कंपन्यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच देशातील कोरोना रुग्णांची संख्या मागील 2-3 आठवड्यापासून उतरत आहे.  

या तिन्ही कंपन्यांनी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत त्यांच्या एकूण हेडकाउंटमध्ये अनुक्रमे वाढ झाल्याचे सांगितले आहे. हेडकाउंट वाढणे हे आयटी कंपन्यांच्या वाढीचे एक सकारात्मक निदर्शक मानले जाते. या तिन्ही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ आणि पदोन्नतीही जाहीर केली आहे. दुस-या तिमाहीतील या कंपन्यांची कमाई विश्लेषकांच्या वर्तवलेल्या अपेक्षेपेक्षा पुढे आहे.

कोरोनाकाळात TCS ने जवळपास 8 हजार फ्रेशर्सची भरती कंपनीत केली आहे. या भरतीची जवळपास सगळी प्रोसेस ऑनलाईनच झाली आहे. टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन कंपनीच्या दुस-या तिमाहीतील कमाईनंतर ही माहिती दिली आहे.

इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी यूबी प्रवीण राव यांनीही नवीन भरतीचे संकेत दिले आहेत. राव यांनी सांगितले की, येणाऱ्या काळात नवीन लोकांची गरज आम्हाला भासणार आहे. मागील तिमाहीत इन्फोसिसमध्ये 5,500 जागा भरायच्या होत्या. त्यातील काही भरल्या आहेत. पुढील तिमाहीत जर कंपनीची चांगली वाढ झाली तर नोकरभरती होण्याची शक्यता आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com