जरा सांभाळून! नवीन वर्षात महागाईची कुऱ्हाड कोसळणार!

जरा सांभाळून! नवीन वर्षात महागाईची कुऱ्हाड कोसळणार!

येणारं वर्ष महागाई घेऊन येणाराय. या वर्षात तुमच्यावर जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे..तेव्हा खर्च करताना जरा सांभाळून.

नव्या वर्षात नव्या खरेदीचा जर तुम्ही बेत आखत असाल तर सावधान! हे नवं वर्ष तुमच्यावर महागाईच्या कुऱ्हाडीचा घाव घालणारं असेल.
जीवनाश्यक वस्तूंसह  घरात लागणारी महत्त्वाची उपकरणं खरेदी करताना, तुमचा खिसा कधी रिकामा होईल, हे कळणारही नाही.

काही दिवसांपूर्वीच दूध महागलंय. गहू, खाद्यतेल महागलंय. कच्च्या मालाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे पाकिटबंद अन्नाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यात बिस्किट, वेफर्स यांसारख्या पदार्थांचा समावेश आहे. नवीन तंत्रज्ञान आणि कमी वीज वापरणारी उपकरणं तयार करण्याचा आग्रह यामुळे फ्रीज आणि टीव्हीच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

आधीच सामान्य माणूस वाढत्या किंमतीमुळे मेटाकुटीला आलाय. त्यात जर हा वाढीव महागाईचा बोजा पडला तर नव्या वर्षात सामान्यांचं कंबरडं मोडेल, हे नक्की...

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com