UNLOCK 5 | 1 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात नवीन नियम, पाहा कोणत्या गोष्टी सुरु करण्यास परवानगी?

UNLOCK 5 | 1 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात नवीन नियम, पाहा कोणत्या गोष्टी सुरु करण्यास परवानगी?

देशभरात कोरोनाचा कहर वाढत असतानाचा, आता अर्थव्यवस्थेवरही भर देणं गरजेचं आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनलॉक 5 चे नवीन नियम जाहीर झालेत. महाराष्ट्रात आता नेमके काय बदल होतील याकडे सर्वांचं लक्ष आहे.

राज्य सरकारने अनलॉक 5 मध्ये आणखी काही सवलती दिल्यात. नव्या आदेशानुसार राज्यात 5 ऑक्टोबरपासून रेस्टॉरंट आणि बार सुरू होणार असून 50 टक्के क्षमतेने रेस्टॉरंट सुरू करण्याची परवानगी देण्यात आलीय. याशिवाय मुंबईच्या डबेवाल्यांना लोकलमधून प्रवासाची परवानगीही देण्यात आलीय. मुंबईच्या लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुण्याच्या लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

दरम्यान, देशात 1 ऑक्टोबरपासून नवे नियम लागू होणार आहेत. गॅस, टीव्ही, विमा पॉलिसी, बेकरी पदार्थ ते मोटार वाहन नियमावलीत बदल होणार आहेत. कोरोनाकाळात देशाची आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणात खालावलीय. याकाळात देशात बेरोजगारीचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलंय. अशातच सामान्य लोकांच्या खिशाला अजून झळ पोहचणार असल्याचे दिसतंय. पुढील महिन्यापासून देशात काही नियम लागू होणार आहेत जे सामान्यांच्या खिशावर थेट परिणाम करतील.

महाराष्ट्रात 1 ऑक्टोबरपासून होणार हे बदल -

  • 31 ऑक्टोबरपर्यंत शाळा बंदच
  • सिनेमागृह सुरु करण्याबाबत उद्या निर्णय
  • राज्यातील लांब पल्ल्यांच्या रेल्वे सुरु करण्याबाबतही विचार सुरु
  • 5 ऑक्टोबरपासून रेस्ट्रॉरंट आणि बार 50% क्षमतेने सुरु केले जातील.
  • लोकलच्या फेऱ्या वाढवल्या जातील.
  • मुंबईतील लोकलमध्ये डबेवाल्यांना परवानगी असेल.
  • पुण्यातही लोकल सुरु होणार
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com