एकनाथ खडसे देणार भाजपला दे धक्का ?

एकनाथ खडसे देणार भाजपला दे धक्का ?

एकनाथ खडसे भाजपला दे धक्का देण्याच्या तयारीत आहेत. एकनाथ खडसे भाजपला लवकरच दे धक्का देण्याच्या तयारीत आहेत. खडसे हातावर शिवबंधन बांधणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. भाजप सत्तेतून पायउतार झाल्यानंतर खडसेंनी नुकतीच मनातली खदखद बोलून दाखवली होती. नाव न घेता देवेंद्र फडणवीसांवर खडसेंनी हल्लाबोल केला होता. त्यातच आता नाराज खडसेंनी आदित्य ठाकरेंची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्यात. त्यातच खडसे-ठाकरे भेटीवर संजय राऊत यांनी सूचक वक्तव्य केल्यानं चर्चांना उधाण आलंय.काही दिवसात खडसे मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याची चर्चा रंगलीय

WebTittle :   Will Eknath Khadse give BJP a push?

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com