नारायण राणेंना विधानपरिषदेत आणणार ?

नारायण राणेंना विधानपरिषदेत आणणार ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्यासाठी भाजप विधानपरिषदेत राणेअस्त्र वापरण्याची तयारी करतंय. नारायण राणे...पूर्वाश्रमीचे कडवे शिवसैनिक आणि आताचे शिवसेनेचे कट्टर विरोधक...हाच चेहरा आता भाजपच्या मदतीला धावून येणारंय. 
उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांच्याविरोधात भाजप नारायण राणे अस्त्र वापरण्याच्या तयारीत आहे. राणे कुटुंब आणि उद्धव ठाकरे यांच्यातलं राजकीय वैर सर्वश्रुत आहे. उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र सोडत नाहीत. त्यामुळेच नारायण राणेंना विधानपरिषदेत आणून सरकारसमोरील अडचणीत वाढ करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल अशी चर्चा आहे. काय आहे भाजपची ही नवी रणनिती? पाहुयात 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com