आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या मदतीला धावतोय 'मुरलीधर'
Murlidhar Raut Helping Suicide Affected Farers Families

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या मदतीला धावतोय 'मुरलीधर'

अकोला : काळी आई कोपल्याने गेल्या दोन दशकांपासून शेतकरी आत्महत्यांचे Farmers Suicide काळोखे सत्र सुरूच आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्या घराला अनेक संकटाचा सामना करावा लागतो. याच कुटुंबाला आधार देण्यासाठी अकोल्यातील ' मुरलीधर' पुढे आलाय. जिल्ह्यातील बाळापूर Balapur येथील शेतकरी, तसेच हॉटेल व्यावसायिक मुरलीधर राऊत यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींच्या विवाह सोहळ्यासाठी Marriage Function  पाहुण्यांच्या जेवणासह मंगलकार्यालय आणि लॉन्स मोफत देत आहेत. शिवाय आर्थिक संकटातील शेतकऱ्यांच्या कुटुंबातील लग्न सोहळ्यासाठी अल्पदरात भोजन उपलब्ध करून देत आहेत. Murlidhar Raut Helping Suicide Affected Farers Families

सामाजिक मदतीच्या भावनेतून त्यांचे हे कार्य सुरू आहे. आतापर्यंत मुरलीधर राऊत यांनी शेतकरी कुटुंबातील मुलामुलींचे  तेवीस लग्न आपल्या मंगलकार्यलयात पार पाडले आहेत. यापैकी चार लग्न हे आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबातील आहेत. या लग्नाचा कुठलाही खर्च मुरलीधर राऊत यांनी त्या कुटुंबापासून घेतला नाही. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आदी कृषी क्षेत्रावरील संकटामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. राज्यात गेल्या दोन दशकांत हजारो शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केले. घरातील कर्ता पुरुषाने स्वतःला संपवलं तर त्या संपूर्ण घराला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. कर्ता बाप गेल्याने घरातील मुलांच्या पालनपोषणाची, विवाहाची जबाबदारी कशी पार पडावी हा प्रश्न निर्माण होतो. 

सध्या  राज्यात लगीनसराई Marriage Season झाली आहे. ग्रामीण भागात Rural Area हे लग्नसोहळे पावसाळा सुरू होईपर्यंत चालतात. मागच्या वर्षी ऐन लगीनसराईत कोरोनाचा प्रकोप होता.  याही कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोना मुळे अनेकांचा रोजगार गेला, व्यवसाय धोक्यात आले. आधीच घरातील कर्ता पुरुष गेल्याने. Murlidhar Raut Helping Suicide Affected Farers Families

आर्थिक परिस्थिती वाईट असणाऱ्या शेतकरी कुटुंबाच्या मदतीला ' मुरलीधर'  धावून आला आहे. आधीच कर्जबाजारी असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी मुलींच्या लग्न खर्चाची तजवीज करू न शकल्याने आपले जीवन संपवून टाकले आहे. तर शेतकरी कुटुंबातील काही मुलीदेखील आपल्या लग्नाची वडिलांना लागलेली चिंता पाहून आत्महत्या करतात. या सर्व मन सुन्न करणाऱ्या घटना आहेत. 

आजही बहुतांश शेतकरी कुटुंबात जमिनीचा तुकडा विकल्याशिवाय किंवा गहाण ठेवल्याशिवाय मुलीचा विवाह सोहळा पार पडू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आज समाजात मंगलकार्यालयाचे भाडे, पाहुण्यांची व्यवस्था, सजावट तसेच भोजन यावर खूप मोठ्या प्रमाणात खर्च येतो. हा खर्च अनेक वधुपित्यांच्या आवाक्याबाहेरचा असतो. याशिवाय लग्नात इतरही बराच खर्च होत असतो. अशावेळी मुरलीधर राऊत आपले संपूर्ण मंगलकार्यालय Marriage Hall, पाहुण्याच्या जेवणाचा संपूर्ण खर्च स्वतः करतात. कोरोना काळ असल्याने लॉक डाऊनचे सर्व  नियम काटेकोरपणे पाळून या त्यांच्या मंगलकार्यात लग्न सुरूच आहेत. 

शेतकरी कुटुंबासाठी मुरलीधर राऊत यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागतच करायला पाहिजे. त्यांना या कार्यात हातभार लागावा म्हणून आर्थिक तसेच अन्नधान्यांच्या मदतीसाठी परिसरातील काही लोक पुढे येत आहेत. मात्र त्यांनी आर्थिक मदत घेण्याचे नाकारले असून, धान्य स्वरूपातील मदत ते घेणार आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे बाळापूर परिसरातील आत्महत्याग्रस्त अन् आर्थिक अडचणीतील शेतकरी कुटुंबांना लग्न सोहळ्यात थोडाफार दिलासा मिळालाय. राज्यात Maharashtra शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे काळोखे सत्र सुरूच आहेय. आत्महत्या किंवा इतर कारणांनी उघडा पडलेला संसाराला मोठ्या ताकदीने मुरलीधर यांनी मदत केलीय.  सध्याच्या लाखोंची उड्डाणे घेणाऱ्या युगात त्यांचा हा प्रयत्न तोकडा असेलही. मात्र तो आश्वासक आहेय. Murlidhar Raut Helping Suicide Affected Farers Families

मोदींच्या मन की बात मधून कौतुक--

शेतकरी व हॉटेल व्यावसायिक असलेल्या मुरलीधर राऊत यांचे मन की बात Maan Ki Baat मधून खुद्द पंतप्रधान मोदींनी कौतुक केले होते. नॉटबंदी काळात राऊत यांनी राष्ट्रीय महामार्ग असलेल्या त्यांच्या मराठा हॉटेल मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना जेवणाच्या बिलाची अडचण असल्याने आता जेवण करा पुढच्या चकरात पैसे द्या असा उपक्रम राबविला होता. तर राष्ट्रीय महामार्ग National Highway क्रमांक ६ चे चौपदरीकरण होणार असल्याने त्यांचे मराठा हॉटेल पाडण्यात आले. त्यांची जमीन चौपदरीकरणात गेली.दरम्यान त्यांना जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी समोर त्यांनी विषप्राशन केले होते. मात्र राऊत तरीही खचून गेले नाही.  त्यांनी आपले मराठा हॉटेल पुन्हा नव्याने उभे केले.
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com