पुढील 3 महिने धोक्याचे, कोरोनाबाबतची ही माहिती वाचाच!

पुढील 3 महिने धोक्याचे, कोरोनाबाबतची ही माहिती वाचाच!

कोरोनावर लस कधी येणार? कोरोनाचा अंत कधी होणार? आपण सारे पूर्वीसारखे मोकळेपणानं केव्हा वावरू? असे अनेक प्रश्न तुमच्या आमच्या मनात आहेत. अशातच कोरोना संदर्भात एक अतिशय मोठी बातमी आलीय..पुढील तीन महिन्यांत कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.

कोरोनाचा कहर कधी संपणार याची प्रतीक्षा तुम्ही-आम्ही सर्वच जण करत आहोत. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आलीय. पुढचे तीन महिने कोरोनाचा कहर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात लोकांनी खुपच सतर्क राहणं गरजेचं आहे. पावसाळा आता संपण्याच्या उंबरठ्यावर आहे. आतापर्यंत देशातील कोरोना रूग्णांच्या संख्येनं उच्चांक गाठलाय. हा दर असाच वाढत राहिला तर पुढील तीन महिन्यांमध्ये रूग्णसंख्या तिप्पट ते चौपट वाढू शकते. मग ती संख्या कोटींच्या घरातही जाऊ शकते. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य सरकार तयारील लागलंय. राज्यातील सर्व खासगी तसच नोंदणीकृत रुग्णालयांमधील शासनानं दर नियंत्रीत केलेल्या 80 टक्के खाटा कोरोना आणि अन्य रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला राज्य शासनानं तीन महिन्यांची मुदतवाढ दिलीय.. 

कोरोना संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशात लॉकडाऊन करण्यात आला. परिस्थिती पूर्वपदावर येतीय असं वाटत असतानाच दिवसागणिक रूग्णांची संख्या वेगानं वाढू लागलीय. अशातच पुढील तीन महिने धोका आणखी वाढणार असल्यानं पुन्हा काही निर्बंध लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाचं गडद होऊ पाहणारं संकट लक्षात घेऊन प्रत्येकानं आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं आवश्यक आहे. 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com