VIDEO | पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर?

VIDEO | पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर?

पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे...विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा बंधू धनंजय मुंडे यांच्याकडून सपाटून पराभव झाला..या पराभवामागे भाजपमधलं अंतर्गत राजकारण होतं, अशा आरोपांचा धुरळा उडाला होता..मात्र, अचानक त्यांची फेसबुक पोस्ट व्हायरल झाली आणि भाजपच्या कंपूत दाणादाण उडालीय.....पोस्टनुसार येत्या 12 डिसेंबरला वडील गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी त्या मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे...
त्यांचा हा निर्णय शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याबाबतचा असू शकतो, अशी शक्यता सध्या बोलून दाखवली जातेय..
त्याला कारणंही तशी आहेत.. शिवसेनेचे गोपीनाथ मुंडे यांच्याशी संबंध नेहमीच जिव्हाळ्याचे राहिलेत..त्यामुळेच 2014 ला युती झाली नाही तरी बीडमधून पंकजा मुंडेंच्या विरोधात शिवसेनेनं उमेदवार दिला नव्हता..प्रीतम मुंडे यांच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीही शिवसेनेनं आपली फौज त्यांच्या पाठिशी उभी केली होती.विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर त्यांचं दर्शनच दुर्लभ झालं होतं..मात्र, त्यांनी फेसबुक पोस्टचा बॉम्ब टाकून, भाजपच्या चाणक्यांना घाम फोडलाय...

Marathi News:Pankaja Munde on the way to Shiv Sena?


 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com