अनवाणी पायांची थाबली होरपळ: वंचितांच्या पायाला मिळाला गारवा...

अनवाणी पायांची थाबली होरपळ: वंचितांच्या पायाला मिळाला गारवा...
Police Constable in Solapur Distributing Chappls to Needy

सोलापूर : कोरोनामुळे Corona महाराष्ट्रामध्ये Maharastr सर्वत्र लॉकडाऊन Lockdown आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता कोणतीच आस्थापन सध्या सुरु नाहीत. सोलापुरात Solapur दिवसेंदिवस उन्हाचा पारा चाळीशी पार करताना दिसत आहे. त्यामुळे बेघर, वंचितांना पायाला उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. Police Constable Giving Footwear to poor and Needy

हीच बाब लक्षात घेऊन सोलापूर मधील शांतीसागर जेनुरे Shantisagar Genure या पोलीस Police शिपायाने संभव फाउंडेशनच्या Sambhav foundation मदतीने वंचित बेघरांच्या अनवाणी पायांना चप्पल देण्याचा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. आई संगीता जेनुरे यांच्या जन्मदिनाच अविचीत्य साधून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. संभव फाउंडेशन ही मागच्या अनेक वर्षांपासून मनोरुग्णासाठी काम करणारी संस्था आहे.

मागच्या वर्षी लॉकडाऊन लागल्यापासून ही संस्था रस्त्यावर उतरून अनाथ, बेघर, मनोरुग्ण, वंचित लोकांना अन्न पुरवण्याचं काम करत आहे. या लॉकडाऊनमध्ये संभव फाउंडेशन आणि पोलीस शिपाई शांतीसागर जेनुरे यांनी चप्पल वाटपाचा कार्यक्रम सुरु केला आहे. त्याला उदंड प्रतिसाद सुद्धा मिळताना दिसून येत आहे. दरम्यान या चपला घातल्यानंतर फुटपाथवर आयुष्य घालवणाऱ्या बच्चे कंपनीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com