बेस्टनंतर आता अग्निशमन दलातंही खासगीकरणाचा घाट, वाचा काय घडलंय?

बेस्टनंतर आता अग्निशमन दलातंही खासगीकरणाचा घाट, वाचा काय घडलंय?

आग लागणे, इमारत, घरे कोसळने, पाण्यात बुडणे आदी सर्वच येणाऱ्या आपत्तीच्या कामांसाठी मुंबई अग्निशमन दलाला बोलावले जाते. या अग्निशमन दलातील पदे रिक्त असल्याने अग्निशमन दलात जीप, कार आदी वाहने चालविण्यासाठी ५४ खासगी कंत्राटी ड्रायव्हर नेमले जाणार आहेत . यावरून आगामी स्थायी समितीत वाद रंगणार आहे.

 प्रक्षिशित यंत्रचालकांना जीप व कार चालवण्यास तैनात केल्यास आगीवर नियंत्रण मिळवणे कठिण होते .काळबादेवीत लागलेल्या आगीच्या घटनेनंतर अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीनं  केलेल्या शिफारसीनुसार अग्निशमन दलातील रुग्णवाहिका, जीप आणि कार चालवण्यासाठी पालिका रिक्त जागा भरण्याऐवजी खाजगी कंत्राटदाराकडून नोकर भरती करणार आहे. तर हा खासगीकरणाचा डाव असून आम्ही त्याचा निषेध करणार असल्याचे भाजपने म्हटलंय .

अग्निशमन दलात एकूण ६६५ यंत्रचालक संवर्गाची पदे आहेत.  यापैकी १५८ पदे रिक्त आहेत. परंतु, अनुभवी चालक मिळत नसल्याने दोन वर्षासाठी ५४ कंत्राटी चालक घेतले जाणार आहेत. याकरिता ५ कोटी ९७ लाख ८७ हजार रुपये यावर खर्च केला जाणार आहे. मेसर्स. KHFM हॉस्पिलिटी अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेसला अटी आणि शर्तीवर हे काम दिले जाणार आहे.अग्निशमन दलातले प्रशिक्षीत जवान हे आपत्कालीन परिस्थितीत जीवाची बाजी लावून आपलं कर्तव्य बजावतात, हीच समर्पणाची भावना खासगी संस्थेकडून नेमल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची असेल का? हा खरा प्रश्न आहे....
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com