चाललंय तरी काय? पुण्यात गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेला २०० दुचाकींची रॅली (व्हिडिओ)

चाललंय तरी काय? पुण्यात गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेला २०० दुचाकींची रॅली (व्हिडिओ)
Youth participated in Last rites rally of goon in Pune

पुणे : पुण्यातील Pune बिबवेवाडी परिसरात १० जणांच्या टोळक्याने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर एका सराईत गुन्हेगाराचा Criminal दगडाने ठेचून आणि तीक्ष्ण हत्याराने वार करून खून Murder केल्यानंतर त्याच गुन्हेगाराचा अंत्यविधी कोरोनाच्या भयावह परिस्थितीत ‘दीडशे दुचाकी’ आणि २०० जणांच्या रॅलीने झाला आहे. Pune Criminal Last procession in two hundred bikes

बिबवेवाडी पोलीस Police ठाण्याच्या हद्दीत कडक लॉकडाऊनमध्ये मध्यरात्री सराईत गुन्हेगार माधव वाघाटे (वय २७) याचा निर्घृण खून करण्यात आला. माधव वाघाटे हा एका गुन्हेगार तर होताच, पण तो आता एका नामचीन गुन्हेगारी टोळीचा सदस्य होता असे सांगितले जात आहे.

दरम्यान, त्याचा खून झाल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली. पण इतर साथीदार पसार झाले आहेत. अद्याप तरी त्यांना पकडण्यात यश आलेले नाही. तोपर्यंत आता माधव वाघाटे याच्या चाहत्यांनी अंत्ययात्रे दरम्यान मोठी दुचाकी रॅली काढली आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. Pune Criminal Last procession in two hundred bikes

हा अंत्यविधी पाहणाऱ्यांचे देखील हाल बेहाल झाले आहेत. तर पोलीस हैराण झाले आहेत. तर हे सगळं भयावह होत असल्याचे बोलू लागले आहेत. कारण, या अंत्यविधीचा एक व्हिडिओ Viral झाला आहे. त्यात जवळपास दीडशे दुचाकीवर सुमारे २०० ते ३०० तरुण जात असल्याचे दिसत आहे.

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com