शरद पवारांची भेट राजकीय नाही,सदिच्छा भेट होती - देवेंद्र फडणवीस
Saam Banner Template

शरद पवारांची भेट राजकीय नाही,सदिच्छा भेट होती - देवेंद्र फडणवीस

जालना : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis आणि शरद पवार Sharad Pawar यांची आज भेट झाली या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून ही केवळ सदिच्छा भेट होती असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.ते जालन्यात Jalna बोलत होते.

फडणवीस यांनी आज जालन्यातील पोलाद स्टील Polaad Steel या स्टील कंपनीच्या ऑक्सिजन प्लॅन्टची तसेच जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लँटची पाहणी केली.त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हे देखील पहा -

ओबीसींच स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द झालं आहे.राज्य सरकार झोपेत असल्यानेच हे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप त्यांनी केला.अजूनही वेळ गेली नसून राज्य सरकारने इंपेरिकल डाटा तयार करावा असंही ते म्हणाले.सध्या राज्यात लावण्यात आलेल्या निर्बंधात अजून शिथिलता देण्यात यावी,लहान व्यवसायिकांचा विचार सरकारने करावा असंही ते म्हणाले. ज्या प्रवर्गाला कोणताही आरक्षण नाही त्यांना ईडब्ल्यूएसचं आरक्षण लागू आहे.

केंद्राच्या कायद्याप्रमाणे मराठा समाजाला १० टक्के आरक्षण मिळेल असंही ते म्हणाले. खाजगी आणि शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या म्यूकर मायकोसिसच्या रुग्णांना राज्य सरकारने मोफत इंजेक्शन द्यावे अशी मागणीही फडणवीस यांनी केलीय.हे सरकार अपयशी ठरल्याने त्यांचं अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकार विरोधात राज्यात आंदोलन करत असल्याचा फडणवीस यांनी  केला आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com