एकाच लसीचे तीन दर कसे? सोनिया गांधींची मोंदींना विचारणा

एकाच लसीचे तीन दर कसे? सोनिया गांधींची मोंदींना विचारणा
soniya gandhi letter

सीरम संस्थेने serum institute कोविशिल्ड Covishield लसीचे vaccine दर जाहीर केले ज्यामध्ये केंद्र व राज्य सरकारसाठी state government वेगवेगळ्या किंमती निश्चित केल्या आहेत. या विषयावर आता कॉंग्रेस Congress अध्यक्षा सोनिया गांधी Soniya Gandhi यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांना पत्र Letter लिहून केंद्र सरकारच्या लस धोरणावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.  Sonia Gandhi's letter to Prime Minister Modi

सोनिया गांधींनी आपल्या पत्रात लिहिले आहे की जेव्हा रूग्णालयात hospital बेड, औषधे, ऑक्सिजनची कमतरता असते तेव्हा अशा प्रकारच्या नफ्याला सरकार कशी परवानगी देऊ शकते. सीरम संस्थेने केंद्र सरकार आणि राज्य सरकारसाठी लसीचे वेगवेगळे दर निश्चित केले आहेत, हे सर्वसामान्यांवर थेट ओझे ठरेल. राज्य सरकारांवर संकट वाढेल आणि सर्वसामान्यांना लसीसाठी जास्त पैसे द्यावे लागतील, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. 

अशा परिस्थितीत समान लस उत्पादक तीन प्रकारचे दर कसे ठरवू शकतो. केंद्र सरकारला लस १५० रुपयात मिळते तिच लस  राज्यांना ४०० रुपये,  तर खासगी रुग्णलयांना ६०० रुपयात तीच कोविशील्ड  लस उपलबद्ध केलीय. हे तीन वेगवेगळे दर कसे ? असा सवाल सोनिया गांधी यांनी विचारला आहे.केंद्र सरकारने तातडीने हे धोरण मागे घ्यावे, असे आवाहन सोनिया गांधी यांनी केले आहे जेणेकरून 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना मोठ्या संख्येने लस मिळू शकतील. तसेच  सोनिया गांधी यांनी आरोप केला आहे की कोरोना लसीच्या नवीन धोरणाद्वारे केंद्र सरकारने 18 ते 45 वर्षांतील लोकांना मोफत लस देण्याची जबाबदारी टाळली आहे. Sonia Gandhi's letter to Prime Minister Modi

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com