सुशील कुमारच्या अडचणीत वाढ; आता नोकरीवरही फेरलं पाणी

सुशील कुमारच्या अडचणीत वाढ; आता नोकरीवरही फेरलं पाणी
sushil kumar

दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमवर (Chhatrasal Stadium) झालेल्या कुस्तीपटू सागर रानाच्या (Sagar Rana) हत्येचा कथित प्रमुख आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार याला उत्तर रेल्वेने निलंबित केले आहे. उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांनी मंगळवारी सांगितले की ''सुशील कुमारला उत्तर रेल्वेच्या नोकरीवरून निलंबित करण्यात आले आहे. कारण त्याच्यावर एफआयआर नोंदविण्यात आला आहे आणि गुन्हेगारी तपास सुरू आहे''. ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार हा उत्तर रेल्वेच्या वरिष्ठ वाणिज्यिक व्यवस्थापक पदावर होता.  2015 पासून तो दिल्ली सरकारमध्ये कार्यरत आहे. शाळा स्तरावरील खेळाच्या विकासासाठी छत्रसाल स्टेडियमवर त्याला विशेष अधिकारी म्हणून देखील नियुक्त केले होते.(Sushil Kumar was fired by the Railways)

अधिकाऱ्यांनी सांगितले की सुशील कुमार याच्या प्रतिनियुक्तीची मुदत 2020 मध्ये वाढविण्यात आली होती.  त्याने 2021 मध्ये सेवेच्या मुदतवाढीसाठी अर्ज केला होता, परंतु दिल्ली सरकारने त्याची विनंती नाकारली आणि त्याला उत्तर रेल्वेच्याच मूळ केडरमध्ये ठेवले. छत्रसाल स्टेडियमवर झालेल्या 23 वर्षीय कुस्तीपटूच्या मृत्यूप्रकरणी आरोप दाखल झालेल्या सुशील कुमार आणि त्याचा सहकारी आरोपी अजय बक्करवाला यांना रविवारी अटक करण्यात आली. ते दोघे जवळजवळ तीन आठवड्यांपासून फरार होते. वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले की एखादा सरकारी अधिकरी गंभीर गुन्ह्यासाठी दोषी आढळल्यास सामान्यत: केस पुढे येईपर्यंत त्याला निलंबित केले जाते.

दरम्यान, ऑलिम्पिक (Olympic) पदक विजेता सुशील कुमारला (Sushil Kumar) सागर रानाच्या खुनाच्या आरोपाखाली (Murder Case) पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तेव्हाच सुशील कुमारच्या अडचणीत वाढ झाल्याचे समजले होते.  4 मे रोजी रात्री उशिरा झालेल्या घटनेपासून सुशील आणि अजय दोघेही फरार होते. पोलिसांनी सुशीलवर एक लाख रुपये आणि अजयवर 50 हजार रुपयांचे बक्षीस देखील जाहीर केले होते. त्याचवेळी रोहिणी कोर्टाने सुशीलचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यातच आता उत्तर रेल्वेने सुशीलला सेवेतून निलंबित केल्याने सुशीलच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com