शिक्षण देण्यासाठी शिक्षकाने घराच्या छतावर तयार केली आगळीवेगळी शाळा

 शिक्षण देण्यासाठी शिक्षकाने घराच्या छतावर तयार केली आगळीवेगळी शाळा
school

अकोला -  जेव्हा माणसाच्या हाताला काम नसते, तेव्हा डोक्यात विविध कल्पना चित्रकलेत  जागृत होतात. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊन काळात अशीच एक भन्नाट कल्पना अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापुर येथील चित्रकार प्रकाश निरखे यांना सुचली. त्यांनी स्वकल्पनेतून आपल्या घराच्या छतावर शाळा सुरु केली असून, या माध्यमातून लहानग्यांना विरंगुळ्यासह ज्ञानार्जन केले जात आहे. (The teacher built a separate school on the roof of the house to teach with laughter)

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील राहणारे प्रकाश निरखे , प्रकाश निरखे यांचे वडील डॉ. सुरेश निरखे तेही एक शिक्षक होते. त्यांनी भान  सामाजिक दायित्व स्वीकारुन अनेक चित्रे  रेखाटली आहेत. त्याच चित्रकलेचा वारसा  जोपासत 'प्रकाश' नेसुद्धा अनेक सुंदर चित्रे रेखाटली आहेत. प्रकाश हे मूर्तिजापुर येथील आदर्श विद्यालयात नोकरी करतात. लॉकडाऊन काळात शाळा बंद असल्याने ते दोन महिने घरात बसून होते. अशातच बागळण्यासह त्यांच्यातील कल्पक कलाकार जागा झाला आणि त्यांनी आपल्या कुंचल्यातून छतापर्यंत  घराचे संपूर्ण छतच चित्रमय केले.  लॉकडाऊनच्या कालावधीत लहानग्यांना घर  पिंजऱ्यासारखे वाटत असताना याचा  त्यांच्या जीवनावर शैक्षणिक, शारीरिक व  मानसिक विपरित परिणाम होऊ नये, याचे भान राखत प्रकाश निरखे यांनी हा आगळावेगळा प्रयोग केलाय 

 शैक्षणिक क्षेत्रात काम करीत  असताना त्यांनी नेमका हाच धागा पकडून आपल्या घराच्या छतावर अनेक टाकाऊ वस्तूपासून शैक्षणिक साधनांची निर्मिती  केली आहे. एवढेच नव्हे तर याच छतावर  त्यांनी झोपाळ्यासह घसरगुंडीही लावली  आहे. यात त्यांनी घराच्या पायऱ्यांपासून ते  छतापर्यंत चित्रकलेचा छंद जोपासत आगळ्यावेगळ्या कल्पनाकारी कुंचल्यातून भिंतीचित्रे, टाकाऊ वस्तूचा सुरेख मेळ घालून सुंदर शैक्षणिक साधने निर्माण केली आहेत. यात तुटलेल्या प्लॅस्टिक कॅन, टायर, तेलाचे पिंप, कूलर यासारख्या अनेक वस्तूंचा समावेश आहे. त्यांनी निर्माण केलेली छतावरची शाळा लहानग्यांसाठी लक्षवेधक ठरली असल्याने परिसरातील लहान बालके छतावर खेळण्याबागळण्यासह शैक्षणिक धडेही घेतात,

प्रकाश निरखे यांनी छतावर निर्माण केलेली शाळा हसत खेळत शिक्षण व शैक्षणिक साधनांचा उत्तम नमुना ठरली आहे. यासाठी त्यांनी स्वतः पदरमोड करुन लॉकडाऊन काळात लहानग्यांना मोठा दिलासा देऊन ही प्रकाशवाट दाखविली आहे.

Edited By - Puja Bonkile 

हे देखिल पहा -  

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com