VIDEO | मे महिन्यातल्या शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द होणार ?

VIDEO | मे महिन्यातल्या शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द होणार ?

शिक्षकांना शिकवण्यापलीकडे दिल्या जाणाऱ्या शाळाबाह्य कामांमुळे त्रस्त असलेल्या शिक्षकांच्या त्रासात आणखी भर पडणार आहे. कारण शिक्षकांच्या हक्काची मे महिन्याची सुट्टी रद्द होणार आहे. जनगणनेसाठी मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या नेमणुका करण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.


जनगणनेच्या कामासाठी नकार देणाऱ्या शिक्षकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. खरं तर शिकवण्यापलीकडे शिक्षकांना २५० हून अधिक शाळाबाह्य कामं दिली जातात. याचा परिणाम शिक्षणाच्या गुणवत्तेवर होतो. त्यात आता जनगणनेच्या कामाचीही भर पडलीय. त्यामुळे शिक्षकांमध्ये आक्रोश निर्माण झालाय.

WebTittle :teacher vacations be canceled in May?


 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com