दहशतवाद्यांच्या रडारवर अयोध्येतील राम मंदिर मात्र, NSGनं उधळला दहशतवाद्यांचा कट

दहशतवाद्यांच्या रडारवर अयोध्येतील राम मंदिर मात्र, NSGनं उधळला दहशतवाद्यांचा कट

दहशतवाद्यांचा मोठा कट उधळण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलंय. अयोध्येतील राम मंदिराचं ठिकाण हे या दहशतवाद्यांचं प्रमुख लक्ष होतं. याशिवाय दहशतवाद्यांनी दिल्ली आणि उत्तर प्रदेशातही मोठ्या घातपाती कारवाया करण्याचा कट रचला होता. 

सुरक्षायंत्रणाच्या सतर्कतेमुळे देशावरचं मोठं संकट टळलंय. या दहशतवाद्यांच्या रडारवर होती अयोध्येतील राममंदिराचं ठिकाण...जिथं काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमीपूजन सोहळा पार पडला होता. इतकच नाही तर या दहशतवाद्यांना दिल्ली आणि उत्तर प्रदेशात हाहाकार घडवायचा होता. अलिकडेच दिल्लीतून इसिसचा संशयित दहशतवादी अबू युसूफ याला अटक करण्यात आलीय आणि त्याच्याच चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आलीय. युसूफ अफगाणिस्तानातील आपल्या म्होरक्यांच्या संपर्कात होता. त्यांच्या रडारवर होती रामजन्मभूमी...राम मंदिराच्या उभारणीला वेग आल्यानं दहशतवादी जगतात प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळे अबू युसूफ सारख्या दहशतवाद्यांच्या माध्यमातून पाकिस्तानी टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्याचं बोललं जातंय. दरम्यान एनएसजीनं युसूफकडून दोन प्रेशर कुकरमध्ये 15 किले आयईडी जप्त केलंय.. या बॉम्बचा वापर कुठे कुठे केला जाणार होता याची कसून चौकशी केली जातीय. 

काय आहे आयईडी?
आयईडी म्हणजे Improvised Explosive Device. हे बनवण्यासाठी पारंपरिक तसच नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. आयईडीचा वापर मोबाईल, रेडिओ, सायकल, फुटबॉल यात केला जाऊ शकतो. या वरून विध्वंस कसा होऊ शकतो याची कल्पना येईल. आयईडी निकामी करण्यासाठी वेगळ्या पद्धतीचा अवलंब केला जातो. 

फायनल व्हीओ - दहशतवादी अबू युसूफच्या धक्कादायक माहितीनंतर उतर प्रदेशात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. अबू युसूफच्या अटकेनंतर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या पायाखालची वाळू सरकलीय. आता या घातापातामागे नेमकी कोणती संघटना आहे, त्याचे म्होरके कोण आहेत हेही लवकरच स्पष्ट होईल. 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com