सोंगाड्या पार्टी करते आहे लसीकरणासाठी जनजागृती!

सोंगाड्या पार्टी करते आहे लसीकरणासाठी जनजागृती!
Nandurbar Tribal Dance Party

नंदूरबार : महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश सीमेवरील आदिवासी ग्रामीण भागातील कलाकारा समोर गेल्या पंधरा महिन्यांपासून लाॅकडाऊनमुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. कलाकारांच्या वारंवार मागणी नंतर कोरोना वरील उपाययोजनांच्या जनजागृती करण्यासाठी शासनाने आता आदिवासी कलाकारांना सोबत घेतले आहे. Tribal In Nandurbar Promoting Corona Vaccination Through Dance

आदिवासी ग्रामीण भागातील लसीकरणाबद्दल असलेले गैरसमज दूर होऊन ग्रामीण भागात लसीकरणाचा टक्का वाढत आहे. सातपुडा दुर्गम भागातील काठी, मोलगी, भांगरापाणी येथे एका दिवसाला ८०० पेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात प्रशासनाला आलेले यश आदिवासी कलाकार सोंगाड्या पार्टी यांच्या जनजागृतीमुळे आलेले आहे. 

हे देखिल पहा

आदिवासी सोंगाड्या पार्टी द्वारे गावागावात जाऊन बोलीभाषेतून गायन व नृत्य सादरीकरण करून जनजागृती केली जात आहे. याला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. जनजागृतीच्या माध्यमातून आदिवासी कलाकारांना देखील रोजगार उपलब्ध होत आहे.Tribal In Nandurbar Promoting Corona Vaccination Through Dance

जिल्ह्यात आज अखेर पहिला आणि दुसरा डोस मिळून दोन लाख २५ हजार ३४० नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या घटल्याने जिल्हा प्रशासनाने आता लसीकरणावर भर दिला आहे.
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com