दुसऱ्या कोरोना लाटेत २२,९५५ कोटींचे विमा दावे

दुसऱ्या कोरोना लाटेत २२,९५५ कोटींचे विमा दावे
Covid Insurance

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत Corona Second Wave देशभरात विमा दाव्यांच्या Insurance Claims संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. १४ मेपर्यंत विविध विमा कंपन्यांकडे १४ लाख ८२ हजार ग्राहकांनी उपचाराच्या खर्चापोटीचे दावे दाखल केले. दाव्यांची एकत्रित रक्कम २२,९५५ कोटी रुपये एवढी आहे. Twenty Two Thousand Crore Insurance Claims in Corona Second Wave

महाराष्ट्रातून Maharashtra सर्वाधिक ५ कोटी ३१ लाख ग्राहकांनी विमा दावे केले आहेत. आतापर्यंत १२.३३ लाख विमा प्रकरणांचा निपटारा झाला असून ११,७९४ कोटी रक्कम वितरित करण्यात आली आहे. जनरल इन्शुरन्स कौन्सिलने त्याबाबत माहिती दिली आहे.

हे देखिल पहा

दुसऱ्या लाटेत कोव्हिडसंदर्भात जागृती वाढल्यामुळे विमा काढणाऱ्या ग्राहकांच्या संख्येतही वाढ झाली. मार्च महिन्यात विविध विमा कंपन्यांना आरोग्य विमा पॉलिसीअंतर्गत ५८,५७२ कोटींची प्रीमियम रक्कम मिळाली. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ १३.३ टक्क्यांची होती.

एप्रिल ते मे महिन्यांत विमा दाव्यांच्या संख्येतही वाढ झाली. एकट्या मे महिन्यात विमा कंपन्यांकडे १५ लाखांच्या जवळपास दावे दाखल झाले. त्यातील अजूनही २.५ लाख विमा प्रकरणे प्रलंबित असून, त्याची एकत्रित रक्कम ११,१६१ कोटी रुपये एवढी भरते.Twenty Two Thousand Crore Insurance Claims in Corona Second Wave

मार्च महिन्यापर्यंत दाखल झालेल्या प्रकरणांची सरासरी रक्कम दीड लाखापर्यंत होती. विमा कंपन्यांकडून प्रतिव्यक्ती सरासरी ९५,६२२ रुपये एवढी रक्कम वितरित करण्यात आली. या काळात कोविड संदर्भातील पॉलिसीचे नूतनीकरण न करणे किंवा विमा पॉलिसी नाकारण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. विमा प्राधिकरण कंपनी इरडाईने त्यात हस्तक्षेप केला.

साडेतीन हजार कोटी वितरित
दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांतून ६५ टक्के विमा दावे दाखल झाले. त्यात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू आणि दिल्ली या राज्यांचा समावेश आहे. एकट्या महाराष्ट्रात ५.३१ लाख ग्राहकांनी ६,८९६ कोटींचे विमा दावे दाखल केले. आतापर्यंत साडेचार लाख ग्राहकांचा दाव्यांचा निपटारा करण्यात आला असून ३,६२३ कोटी रुपये वितरित झाले आहे. त्या खालोखाल गुजरात, कर्नाटक, दिल्ली, तामिळनाडू आदी राज्यांतून सर्वाधिक विमा दावे दाखल केले गेले आहे. Twenty Two Thousand Crore Insurance Claims in Corona Second Wave

एकूण विमा दाव्यांची संख्या आणि वितरित रक्कम

महाराष्ट्र
- एकूण दावे ः ५,३५,५१३
- एकूण रक्कम ः ६८९६ कोटी
- निकालात निघालेली प्रकरणे ः ४,४८,९८६
- वितरित रक्कम ः ३,६२३ कोटी

गुजरात
- एकूण दावे - १,६६,५७२
- एकूण रक्कम - २,२७१ कोटी
- निकालात निघालेली प्रकरणे - १,३२,९६८
- वितरित रक्कम - १,३२७ कोटी

कर्नाटक
- एकूण दावे - १,२३,५६२
- एकूण रक्कम - १,९०४ कोटी
- निकालात निघालेली प्रकरणे - १,०२,५४७
- वितरित रक्कम - ९६८ कोटी

तमिळनाडू
- एकूण दावे - १,१९,०६८
- एकूण रक्कम - २,२६७ कोटी
- निकालात निघालेली प्रकरणे - १,००,८०२
- वितरित रक्कम - ९९९ कोटी

दिल्ली
- एकूण दावे - ८३,२२९
- एकूण रक्कम - १,५७४ कोटी
- निकालात निघालेली प्रकरणे ः ७१,०८१
- वितरित रक्कम - ८६३ कोटी

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com