VIDEO | परळीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा हैदोस

VIDEO | परळीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा हैदोस

हाणामारीची ही दृष्य पाहा. राड्याची ही दृष्य आहेत परळीतली. परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी समोर आलीय. टॉवर चौकात पुण्याचे व्यापारी अमर देशमुख यांना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गणेश कराड आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण केली. स्वत:ला धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते म्हणवून घेणाऱ्या या टोळक्यानं अक्षरश: लाठ्या-काठ्यांनी, दगडांनी मारहाण केली. दरम्यान व्यक्तिगत भांडणात आपलं नाव जोडू नये अशी भूमिका धनंजय मुंडेंनी घेतलीय.

हा सगळा प्रकार प्रॉपर्टीच्या वादातून झाला असल्याचं सांगण्यात येतंय. राज्याच्या सामाजिक न्यायमंत्र्यांच्या मतदारसंघातच भरदिवसा हाणामारी होते.. हाणामारी करणारं टोळकं मंत्रीमहोदयांचं नाव घेत मारहाण करतो. ही नक्कीच चिंताजनक बाब आहे.

WebTittle ::  VIDEO | Hadidos of NCP activists in Perl

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com