VIDEO | शिवसेनेच्या 'हिंदुह्रदयसम्राट'ला मनसेच्या 'हिंदूजननायक'ची टक्कर

VIDEO | शिवसेनेच्या 'हिंदुह्रदयसम्राट'ला मनसेच्या 'हिंदूजननायक'ची टक्कर

महाअधिवेशनात मनसेनं हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटल्यानंतर आता मनसेनं हिंदुत्वाच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकलंय. ९ फेब्रुवारीच्या मोर्चासाठी वातावरणनिर्मिती करताना मनसेनं शिवसेनेच्या वर्मावर बोट ठेवलंय. शिवसैनिक बाळासाहेबांचा उल्लेख हिंदूह्रदयसम्राट करतात, आता या उपाधीला टक्कर देण्यासाठी मनसैनिक राज ठाकरेंना हिंदूजननायक म्हणणार आहेत.

९ फेब्रुवारीच्या मोर्चासाठी मनसेकडून भगव्या टोप्यांचं वाटप करण्यात आलंय. आता काळ्या रंगाच्या टीशर्टवर एल्गार हिंदूजननायकाचा असा मजकूर छापण्यात आलाय. राज ठाकरेंना हिंदूजननायक अशी उपाधी देण्यात आलीय. शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा खेचण्यासाठी आता मनसेकडून हरतऱ्हेचे प्रयत्न सुरु झालेत. 

WebTittle :: VIDEO | Shiv Sena's 'HinduHardayasrat' collides with MNS's 'Hindujanayak'


 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com