VIDEO | पाकिस्तानमध्ये सापडलं विष्णू मंदिर

VIDEO | पाकिस्तानमध्ये सापडलं विष्णू मंदिर

पाकिस्तानमध्ये सापडलंय पुरातन विष्णू मंदिर. हो आम्ही खरं बोलतोय. पाकिस्तानी पुरातत्व खात्याच्या उत्खननामध्ये हे तेराशे वर्षांपूर्वीचं मंदिर सापडलंय. पाहूयात विशेष रिपोर्टमधून.

मंदिराच्या अवशेषाचे व्हिज वापरावेत.  मंदिरातील घंटेचा ऑडिओ वापरावा) हे अवशेष कुठल्या डोंगराचे किंवा कुठल्या वाड्याचे नाहीयत.  तर हे आहे विष्णूचं मंदिर.  आणि ते सापडलंय पाकिस्तानात. पाकिस्तानच्या स्वात जिल्ह्यातील एका अवाढव्या डोंगराखाली या मंदिराचे अवशेष सापडलेयत. 

पाकिस्तानच्या स्वात जिल्ह्यातील डोंगराखाली विष्णूमंदिराचे अवशेष सापडलेत. पाकिस्तानी पुरातत्व खात्याच्या उत्खननात विष्णूमंदिराचे अवशेष सापडले आहेत. हे विष्णूमंदिर 1300 वर्षांपूर्वी बांधलं असल्याची माहिती देण्यात आली असून मंदिराशेजारी पाण्याची टाकी आणि छावणीचेही अवशेष सापडले आहेत. हे विष्णूमंदिर हिंदू राजाने बांधल्याची माहितीही पाक पुरातत्व खात्याने दिलीय.

पाकिस्तान हा फाळणीआधी भारताचाच भाग होता.  त्यामुळे त्याकाळच्या ऐतिहासिक, भौगोलिक घटनांच्या पाऊलखुणा जशा भारतात सापडतात तशाच त्या पाकिस्तानमध्येही सापडतात. आता या विष्णूमंदिराच्या अवशेषांचं पाकिस्तान काय करतंय आणि भारताची भूमिका काय असेल याबद्दल  उत्सुकता वाढलीय.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com