VIDEO | आदित्य ठाकरे बनणार शॅडो मुख्यमंत्री ?

VIDEO | आदित्य ठाकरे बनणार शॅडो मुख्यमंत्री ?

आदित्य ठाकरेंची कॅबिनेटमंत्रीपदावर वर्णी लागलीय. आदित्य ठाकरेंना एक मोठी जबाबदारी देण्यासाठीच ही वर्णी लागल्याची चर्चा आहे. PMO अर्थात पंतप्रधान कार्यालयाच्या धर्तीवर ठाकरे सरकारकडून राज्यात स्वतंत्र CMO विभाग स्थापन केला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या स्वतंत्र विभागाचे मंत्री म्हणून आदित्य काम पाहतील, अशी चर्चा आहे.

भविष्यात आदित्य ठाकरेंना एखाद्या मोठ्या भूमिकेसाठी तयार करण्याच्या दृष्टीनं शिवसेनेकडून हे पाऊल उचलण्यात येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंधित खात्याची जबाबदारीही कदाचित आदित्य यांच्याकडे सोपवण्याच येऊ शकते.

आदित्य ठाकरेंची ही आमदारकीची पहिलीच टर्म आहे. प्रशासकीय आणि पटलावरील अनुभवात आदित्य अजूनही कच्चेच आहेत. त्यामुळेच आदित्य यांना एखाद्या मंत्रीपदापुरतं सीमीत ठेवण्यापेक्षा थेट CMO मंत्री बनवण्याची रणनीती आखण्यात आलीय. निवडणूक प्रचारादरम्यान असे अनेक क्षण आले जिथे आदित्य ठाकरेंचं नाव मुख्यमंत्री म्हणून समोर आलं. त्याच पार्श्वभूमीवर शॅडो मुख्यमंत्री म्हणून आता आदित्य यांची प्रतिमा तयार करण्याचे प्रयत्न सुरु झाल्याची चर्चा आहे.

Marathi News : VIDEO | Will Aditya Thackeray become Shadow CM?

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com