कोणी लस घेता का लस ? भंडाऱ्यात नागरिकांना लस देण्यासाठी जिल्हा प्रशासनाची भटकंती
doctor and patient

कोणी लस घेता का लस ? भंडाऱ्यात नागरिकांना लस देण्यासाठी जिल्हा प्रशासनाची भटकंती

भंडारा   - कोणी लस Vaccine घेता का लस ? काय एकताय....पण हे खरे आहे. ही परिस्थिति भंडाऱ्यात Bhandara बघायला मिळत असून नागरिकांना कोरोना Corona लस देण्यासाठी भंडारा जिल्हा प्रशासनाची भटकंती Wandering सुरु झाली आहे. जिल्हा प्रशासनाने मोठ्या थाटा- माटा लसीकरण केंद्र थाटले खरे पण लोक लसीकरण केंद्रावर फिरता फिरेना झाले आहे. लसीकरण केंद्रांवर कर्मचारी नागरिकांची वाट पाहताना दिसत आहेत. यामुळे भंडारा आरोग्य विभागाची Health department
तारांबळ उडाली असून अश्याने  कोरोनाला कसे रोखु असा प्रश्न भंडारा जिल्हा प्रशासनाला Bhandara District Administration पडला आहे. Wandering of district administration to vaccinate citizens in Bhandara

राज्यात कोरोना लस उपलब्ध न झाल्याने अनेक जिल्ह्यात लसीकरण बंद पडल्याचे चित्र उभे ठाकले असून लसीकरनासाठी नागरिक आणि प्रशासनात खडाजंगी उडत असतांना दिसत आहे. उलटपक्षी भंडारा जिल्ह्यात लसी मुबलक प्रमाणात उपलब्ध असून सुद्धा भंडारा जिल्हा वासियांनी लसीकरणाकडे पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्रे ओसाड पडली असून नागरिकांसाठी लावलेला खुर्च्या रिकाम्या दिसत आहे. अनेक लोक विशेषता ग्रामीण भागातील लोक कोरोना लस घेण्यास घाबरत असून अशी परिस्थिति  निर्माण झाली आहे. लसीमुळे शरीरावर दुष्परिणाम होत असल्याचा समज अनेक नागरिकांमध्ये असल्याने लसीकरण केंद्रांवर नागरिक येत नसल्याचे समोर येत आहे. 

हे देखील पहा -


भंडारा जिल्ह्यात सद्धा 20 हजार लसी उपलब्ध असून 18 ते 44 वयोगट व 45 वयोगटा वरील नागरिकांना जिल्ह्यात 141 केंद्रांवर लस दिली जात आहे. जिल्ह्यात आता पर्यंत 2 लाख 17 हजार 118 लोकांना लसीकरण असले तरी जिल्हाची लोकसंख्या बघता ही आकडेवारी कमीच आहे. यात आता ग्रामीण भागातील लोकांनी लसीकरण केंद्रांकडे पाठ फिरवली असून कोरोना रोखण्यासाठी  नागरिकांनी लसीकरण करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. Wandering of district administration to vaccinate citizens in Bhandara

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण जग हादरून गेले आहे. यंदा महाराष्ट्रात तर कोरोनाने कहर केला असून उपचारा अभावी अनेक लोकांचा मृत्यू होत आहे. या कोरोनाच्या साखळीला तोडण्यासाठी टाळेबंदी सह लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने आता ग्रामीण भागात लसीकरण करण्यासाठी नागरिकांना कसे प्रोत्साहित करावे व कसे कोरोनाला रोखावे असा प्रश्न जिल्हा प्रशासाना समोर पडला आहे.

Edited By - Shivnai Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com