VIDEO | सावधान! तुम्ही पिताय उष्टं दूध? पाहा नेमकं काय आहे ऑपरेशन पुतणा मावशी?

VIDEO | सावधान! तुम्ही पिताय उष्टं दूध? पाहा नेमकं काय आहे ऑपरेशन पुतणा मावशी?

सावधान...तुम्ही आवडीनं दूध पिताय तर सावध व्हा. तुमच्या जीवाशी कुणीतरी खेळतंय? तुम्ही पित असलेल्या दुधात कोणीतरी विष कालवतंय. हे तुम्हीच पाहा...

हा व्हिडीओ पाहून पुन्हा दूध पिण्याची इच्छाच होणार नाही. हा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. कोण आहे हा भामटा? तुमच्या जीवाशी खेळ करतोय. म्हैशीचं दूध काढत असतानाच हा काय करतोय बघा? दूध काढत असताना भांड्याला तोंड लावून हा दूध पितोय. पुन्हा एकदा बघा. आणि उष्टं दूध पुन्हा बादलीत टाकतोय. हा इथवरच थांबला नाही तर पुढे काय करतो पाहा. दूध कमी पडू नये म्हणून हा तिथेच असलेलं घाण पाणी दूधानं भरलेल्या बादलीत टाकतो आणि कुणी बघितलंच नाही असा यानं आव आणलाय. पण, याच्या या काळ्या कृत्याचा सगळा कारनामा कॅमेऱ्यात कैद झाला. आणि याचं पितळ उघडं पडलं.

लोकांच्या जीवाशी खेळताना याला थोडीही लाज वाट वाटत नाहीये. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. कित्येक जण हा व्हिडीओ मुंबईतल्या जोगेश्वरीतला असल्याचा दावा करतायत. पण, हा व्हिडीओ कुठला आहे ते आम्ही सांगणारच आहोत. मात्र, असं दुधात विष कालवून लोकांच्या जीवाशी खेळणारा हा कोण आहे? खरंच हा व्हिडीओ महाराष्ट्रातील आहे का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी या व्हिडीओमागचं सत्य समोर आलं.

दुधात विष कालवणारा कोण ?

  • व्हायरल व्हिडीओ मुंबईच्या जोगेश्वरीतला नाही
  • दुधात भेसळ करणारा व्हिडीओ हैदराबादचा आहे
  • हैदराबादच्या जहांगीर डेअरीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय
  • दूधात भेसळ करणारा आणि डेअरी मालकावर कारवाई झालीय

हा धक्कादायक प्रकार हैद्राबादच्या डांगुळशिफा येथील गोल खबर इथे घडलाय. यांच्यावर पोलिस कारवाई करतीलच पण, तुम्ही दूध विकत घेताना काळजी घ्या. कारण, काही पैशांसाठी असे भामटे तुमच्या आमच्या जीवाशी खेळ करतायत.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com