VIDEO| भारतात हिटलर कुणाचा गुरु ?

VIDEO| भारतात हिटलर कुणाचा गुरु ?

राजकारणात ‘हिटलर’ हे प्रतीक वापरून होणारी टीका-टिप्पणी, वेगवेगळ्या चॅनेल्सवरील चर्चामध्ये होणारा हिटलरचा उल्लेख एवढय़ापुरताच आता हिटलर मर्यादित राहिला नाही. आता हिटलर देशातल्या तरुणांनाही भुरळ पाडायला लागलाय. आम्ही असं म्हणतोय कारण हिटलरच्या ‘माईन काम्फ’ या जाहीरनामावजा आत्मचरित्राच्या खपात गेल्या काही काळात लक्षणीय वाढ झालीय. धक्कादायक म्हणजे महात्मा गांधी यांच्या सत्याचे प्रयोग ग्रंथापेक्षाही अलीकडे हिटलरचं माईन काम्फ हे चरित्र बेस्ट सेलर ठरतोय.

दोन वर्षांत ‘माईन काम्फ’च्या १० हजारापेक्षा अधिक प्रती विकल्या गेल्याचंही प्रकाशक आणि विक्रेत्यांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे औरंगाबादमध्ये केवळ एका पुस्तक प्रदर्शनात एका महिन्यात मराठी आणि इंग्रजीच्या जवळपास १ हजार कॉपी विक्री झाल्या आहेत. 

राजकारणात सध्या हिटलर, हिटलरशाही, हुकूमशाही म्हणत विधानं करण्याचा  पायंडा पडलाय. त्यामुळं सामान्य माणसाच्या मनात हिटलरविषयी कुतूहल निर्माण होणं साहजिक आहे. पण हिटलरच्या क्रूरतेचं वर्णन करणारी, त्याच्या हुकूमशाहीचा पर्दाफाश करणारी पुस्तकं खपली जाण्याऐवजी हिटलरच्या आत्मचरित्राची विक्री लक्षणीय वाढलीय, ही नक्कीच विचार करण्याजोगी बाब आहे.  

WebTittle :: Whose Hitler is the Guru in India?

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com