VIDEO | 1800 रुपयांचा वाद, सोशल मीडियात धुरळा

VIDEO | 1800 रुपयांचा वाद, सोशल मीडियात धुरळा

1800 रुपये मागणाऱ्या काकू सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायत. कुणी हा व्हिडीओ पाहून त्यांची चेष्टा करतंय. तर कुणाला काकूंची दया आलीय. प्रतिक्रियांचा पाऊस पडलाय. आणि याच प्रतिक्रियांनी कहर केलाय. बघुयात एक व्हिडीओ आणि त्यानंतरचा प्रतिक्रियांचा धुरळा.
1800 रुपये मागणाऱ्या काकू आता फारच कमी लोक शिल्लक असतील ज्यांनी हा व्हिडीओ पाहिला नसेल.

1800 रुपयांसाठी आक्रमक झालेल्या काकू पाहून तुम्हाला वाटेल, या पोरांनी काकूंना गंडवलंय. पण मंडळी हे प्रकरण तसं दिसत नाहीये.

घरकाम करणाऱ्या या काकूंना मुळातच 1800 रुपये म्हणजे किती? हेच ठाऊक नाहीये.. आणि त्या अज्ञानातून होणारी हे विनोदनिर्मिती. पण याच काकूंच्या व्हिडीओवर आता प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. एका काकांनी या चर्चेत उडी घेतलेय.. 

फक्त हे काकाच काकूंच्या फसवणुकीची गंभीर दखल घेत नाहीयेत. तर सरकारी पातळीवरही काकूंच्या व्हिडीओची गंभीर दखल घेण्यात आलेय. 

 आपल्या कष्टाचे 1800 रुपये मागणाऱ्या काकूंना कदाचित तेव्हा याची कल्पनाही नसावी, की पुढे हे इतकं रामायण त्यांच्या 1800 रुपयांवरुन होईल. पण आता ते झालंय. सरकारने दखल घेतलेय. त्यामुळे काकूंसारख्या घरकाम करुन संसाराचा गाडा हाकणाऱ्या अशिक्षित महिलांच्या प्रश्नाकडे या विनोदाच्या अंगाने का होईना, लक्ष गेलंय. कोरोनाच्या काळात हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतोय

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com