जनतेच्या आग्रहाखातर उमेदवारी; पक्षाला अडचणीत आणण्याचा हेतू नाही.

भारत नागणे
गुरुवार, 1 एप्रिल 2021

मुख्यमंत्री  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Chief Minister shivSena chief Uddhav Thackeray) यांनी जी निलंबनाची कारवाई केली आहे.  ही कारवाई अपेक्षितच होती, पक्षाला कोणत्याही प्रकारे अडचणीत आणण्याचा आपला हेतू नव्हता

पंढरपूर  : मुख्यमंत्री  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जी निलंबनाची कारवाई केली आहे.  ही कारवाई अपेक्षितच होती, पक्षाला कोणत्याही प्रकारे अडचणीत आणण्याचा आपला हेतू नव्हता, असा खुलासा शिवसेनेच्या निलंबित महिला आघाडी प्रमुख शैला गोडसे यांनी केला आहे. Expelled Shivsena Leader from Solapur Shaila Godse Clarifies Her Stand

पंढरपूर - मंगळवेढा (Pandharpur Mangalwedha) पोटनिवडणुकीत गोडसे यांनी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) उमेदवार भगिरथ भालके यांच्याविरोधात अपक्ष अर्ज दाखल केला आहे. म्हणून शिवसेना (ShivSena) सोलापूरच्या महिला आघाडी प्रमुख असलेल्या शैला गोडसे (Shaila Godse) यांची शिवसेनेकडून हाकलपट्टी करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) धर्म न पाळल्यामुळे शिवसेनेकडून गोडसे यांच्यावर कारवाई केली आहे. कारवाईनंतर शैला गोडसे म्हणाल्या, "शिवसेना पक्षप्रमुख यांची निलंबनाची कारवाई अपेक्षितच होती.  पक्षाला अडचणीत आणण्याचा कोणताही हेतू नव्हता, 2019 पासून  पक्षाच्या आदेशानंतर माघारी घेतली होती. पंढरपूर - मंगळवेढा येथील जनतेच्या आग्रहामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. महिला जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असताना शिवसेना घराघरात पोहोचवली आहे. पक्षाने भरभरून दिले आहे,'' Expelled Shivsena Leader from Solapur Shaila Godse Clarifies Her Stand

पक्षाने केलेल्या कारवाईवर आपण नाराज नसल्याचेही यावेळी शैलाजा गोडसे यांनी सांगितले आहे. पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील प्रश्न घेऊन मी निवडणुकीला सामोरे जाणार आहे असे त्या यावेळी म्हणाल्या.

Edited By-Digambar Jadhav 


संबंधित बातम्या

Saam TV Live