आधार-पॅनकार्ड लिंक करण्याला मुदतवाढ

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

नवी दिल्ली - तुम्ही अद्याप आधारकार्डसोबत पॅन कार्ड लिंक केले नसेल तर आता काळजी करण्याची गरज नाही. कारण आधार पॅन कार्ड लिंक करण्याला केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मुदतवाढ दिली आहे. 

नवी दिल्ली - तुम्ही अद्याप आधारकार्डसोबत पॅन कार्ड लिंक केले नसेल तर आता काळजी करण्याची गरज नाही. कारण आधार पॅन कार्ड लिंक करण्याला केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मुदतवाढ दिली आहे. 

आता नागरिकांना ३१ मार्च २०२० पर्यंत आधार कार्ड आणि पॅन लिंक करता येणार आहे. यासाठी शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१९ होती. त्याला आता मुदतवाढ देण्यात आली आहे.आत्तापर्यंत आठ वेळा केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आधार पॅनकार्ड लिंक करण्याची मुदत वाढवली आहे. कर विभागाने यासंबधीची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात आधार कार्ड योजना संवैधानिक दृष्ट्या वैध असल्याचा निर्णय दिला होता. आधार बायोमॅट्रिक आयडी प्राप्तिकर भरताना आणि पॅनकार्ड देताना अनिवार्य असल्याचा निर्णय दिला होता.

WebTittle : Expiry date for linking Aadhaar-Pancard

संबंधित बातम्या

Saam TV Live