VIDEO | डॉक्टरच्या वेशातले दरोडेखोर, वृद्धांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

साम टीव्ही
शनिवार, 29 ऑगस्ट 2020
  • सावधान! कोरोनाचं कारण देऊन घरात घुसतील
  • तुमच्या घरात चोरी करुन धूम ठोकतील
  • वृद्धांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

आता बातमी आहे, ती डॉक्टरांच्या वेशात तुमच्या घरात शिरु पाहणाऱ्या दरोडेखोरांची. कोरोना सर्वेच्या नावाखाली तुमच्या घरात येणारे लोक, हे कुणी भुरटे तर नाहीयेत ना, याची खात्री करुन घ्या. नाहीतर ही चूक तुम्हाला महागात पडेल. साताऱ्यामध्ये असाच एक प्रकार घडलाय. बघुयात... 

आता बातमी आहे, ती डॉक्टरांच्या वेशात तुमच्या घरात शिरु पाहणाऱ्या दरोडेखोरांची. कोरोना सर्वेच्या नावाखाली तुमच्या घरात येणारे लोक, हे कुणी भुरटे तर नाहीयेत ना, याची खात्री करुन घ्या. नाहीतर ही चूक तुम्हाला महागात पडेल. साताऱ्यामध्ये असाच एक प्रकार घडलाय

कोरोनामुळे सगळेच जण घरात आहेत. शेजारी-पाजारीही फार जाणं होत नाही.  कोरोनाच्या भीतीने वृद्ध मंडळीही घरीच आहेत. याचा फायदा घेत काही भुरट्यांनी कोरोना सर्व्हेच्या नावाखाली लूट सुरु केलेय. 

साताऱ्याच्या रविवार पेठत असाच प्रकार घडला. ज्यात या दरोडेखोरांनी एका वृद्ध महिलेला बंदुकीचा धाक दाखवून चोरीचा प्रयत्न केला. महिलेचा आरडा ओरडा ऐकून शेजारी धावत आले. आणि हा प्रसंग टळला. 

कोरोना व्हायरसमुळे सगळेच भयभीत आहेत. त्यात कोरोना सर्व्हेचं नाव पुढे करुन हे असले भुरटे वृद्धांना लुटू पाहतायत. त्यामुळे गरज आहे, ती आता अधिक सतर्क राहण्याची. त्यामुळे खातरजमा केल्याशिवाय एकट्या दुकट्या माणसांनी कुणाला घरात न घेतलेलंच शहाणपणांचं ठरेल.


संबंधित बातम्या

Saam TV Live