आता 'एक्स्प्रेस वे' अडीचशे कॅमेऱ्यांच्या देखरेखीत

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

पुणे: वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यामुळे 'एक्स्प्रेस वे'वर अपघात मोठ्या संख्येने अपघात होतात. आतापर्यंत दीड हजारांपेक्षा अधिक व्यक्तींचा अपघाती मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच बसचालकाच्या चुकीमुळे पुण्यातील एका प्रख्यात डॉक्टरचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे 'एक्स्प्रेस वे'वरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. पाच वर्षांपूर्वी अभिनेता आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे व त्याचा लहान मुलगा 'एक्स्प्रेस वे'वर अपघातात मरण पावले होते. त्या वेळी पेंडसे यांचा भाऊ तन्मय पेंडसे यांनी 'एक्स्प्रेस वे'वर सुरक्षित वाहतुकीसाठी अभ्यास करून 'व्हिडिओ सर्व्हिलन्स'ची योजना मांडली होती.

पुणे: वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यामुळे 'एक्स्प्रेस वे'वर अपघात मोठ्या संख्येने अपघात होतात. आतापर्यंत दीड हजारांपेक्षा अधिक व्यक्तींचा अपघाती मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच बसचालकाच्या चुकीमुळे पुण्यातील एका प्रख्यात डॉक्टरचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे 'एक्स्प्रेस वे'वरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. पाच वर्षांपूर्वी अभिनेता आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे व त्याचा लहान मुलगा 'एक्स्प्रेस वे'वर अपघातात मरण पावले होते. त्या वेळी पेंडसे यांचा भाऊ तन्मय पेंडसे यांनी 'एक्स्प्रेस वे'वर सुरक्षित वाहतुकीसाठी अभ्यास करून 'व्हिडिओ सर्व्हिलन्स'ची योजना मांडली होती. त्याच धर्तीवर पुढे 'एक्स्प्रेस वे'वर 'आयटीएमएस' उभारण्याचा निर्णय झाला होता.
'एक्स्प्रेस वे'वर 'आयटीएमएस' बसविण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठिविण्यात आला होता. त्याला मान्यता मिळाली असून, त्याची निविदा प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. चार नोव्हेंबरपर्यंत निविदा स्वीकारण्यात येणार आहेत. यानुसार 'एक्स्प्रेस वे'च्या दोन्ही लेनवर लवकरच 'सीसीटीव्ही' कॅमेरे बसिवण्यात येणार असून, मार्गाच्या दोन्ही बाजूला वाहतूक नियमांचे फलक लावले जाणार आहेत. यासह अनेक वैविध्यपूर्ण आधुनिक यंत्रणांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.
वाहनाचा वेग तपासणे, लेन कटिंगवर नजर ठेवणे, नंबर प्लेटचा ऑटोमॅटिक फोटो काढणे अशी वैशिष्ट्ये असलेले सुमारे अडीचशे कॅमेरे, ओव्हरलोड वाहनांचे वजन मोजण्याची यंत्रणा आणि हवामानाची माहिती देणारे 'सेन्सर पोल' आदी वैविध्यपूर्ण गोष्टींचा पुणे-मुंबई 'एक्स्प्रेस वे'वर उभारण्यात येणाऱ्या इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टममध्ये (आयटीएमएस) समावेश असणार आहे.
स्पॉट स्पीड डिटेक्शन सिस्टीम, अॅव्हरेज स्पीड डिटेक्शन सिस्टम, लेनची शिस्त मोडणे, चुकीच्या दिशेने एंट्री, जनरल सर्व्हिलन्स, डोम कॅमेरे, स्थिर कॅमेरे, ३६० डिग्रीमध्ये फिरणारे कॅमेरे असे अडीचशेहून अधिक कॅमेरे बसविले जाणार आहेत.

WebTittle: Now the 'Express Way' is overseen by two hundred and fifty cameras


  


संबंधित बातम्या

Saam TV Live