तौक्ते चक्रीवादळानंतर आता मुंबईसह कोकण किनारपट्टीला अतिवृष्टीचा इशारा

Extreme levels of rainfall are expected along the Konkan coast including Mumbai
Extreme levels of rainfall are expected along the Konkan coast including Mumbai

मुंबई : मुंबई Mumbai महानगर क्षेत्रासह कोकणातील Kokan सर्व जिल्ह्यांत बुधवार ते शनिवार या चार दिवसांमध्ये अतिवृष्टी Heavy rain होणार असल्याचा इशारा राज्य सरकारला हवामान विभागाने Meteorological Department दिला आहे. या दिवसामध्ये दिवसभरात ३०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याने संकेत दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने State Government सर्व जिल्हाधिकारी व प्रशासनाला अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. Extreme levels of rainfall are expected along the Konkan coast including Mumbai

धोकादायक इमारती, दरडग्रस्त भाग आणि सखल भागातील नागरिकांना गरजेनुसार सुरक्षितस्थळी हलवण्याचे काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोना रुग्णालयांची सुद्धा काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackrey यांनी दिले आहेत.

अतिवृष्टीचा धोका तौक्ते चक्रीवादळानंतर Tauktae Cyclone मुंबईसह कोकण किनारपट्टीला आता आहे.  ९ जून ते १२ जून या चार दिवसांत अतिवृष्टी काळात गरज पडल्यास मदतीसाठी तटरक्षक दल, नौदलाला तयार राहण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. किनारपट्टी भागात होणाऱ्या या अतिवृष्टीची माहिती स्थानिक प्रशासनाने नागरिकांनाही द्यावी, पावसामुळे या काळात नद्यांचा प्रवाह बदलत असतो. त्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरते हे लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांची काळजी घ्यावी.

पालकमंत्र्यांनी बैठका घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या जिल्ह्याच्या संभाव्य मदत कार्याची रूपरेखा निश्चित करावी. गावांच्या पुनर्वसनाला लागणारा दीर्घ काळ विचारात घेता, आता तातडीची गरज म्हणून या भागातील लोकांचे प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.

हे देखील पहा - 

मुंबई महानगर प्रदेशात या ४ दिवसांत जास्त पाऊस होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यानुसार ११ व १२ जून रोजी या जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. १० जून रोजी जिल्ह्यात मुसळधार पाऊस, तर पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे.

अतिवृष्टीच्या काळात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (SDRF) तुकडय़ा आवश्यकतेनुसार तैनात केल्या जाव्यात. तसेच या काळात होणाऱ्या संभाव्य अतिवृष्टीची ओएनजीसी तसेच इतर केंद्रीय संस्थांना माहिती देऊन सतर्क राहण्यास सांगण्यात यावे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आहेत. 

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com