10 वर्षांत पाण्याची भीषण टंचाई,पाणी मिळणार रेशनिंगवर?

साम टीव्ही
बुधवार, 24 मार्च 2021

पाणी मिळणार रेशनिंगवर?
10 वर्षांत पाण्याची भीषण टंचाई
महाराष्ट्राच्या पोटातलं पाणी कमी होतंय

 

 

 

कितीही पाऊस पडला तरी राज्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात पाण्याची टंचाई निर्माण झालीय. हिच स्थिती कायम राहिल्यास पुढच्या 10 वर्षांत पाणी रेशनिंगवर मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबईत फ्लाईंग वडापावची चर्चा,रघु डोसावाल्याची 60 वर्षांची 

महाराष्ट्रात पाण्याचा वापर वाढतोय. पण पाणी अडवलं आणि जिरवलं जात नाही. त्यामुळं येत्या काळात महाराष्ट्राला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाही. पाणी रेशनिंगवर मिळेल तो दिवस फार दिवस लांब नाही. सध्याचा भूगर्भातील पाणी उपसा आणि जलप्रदूषणाचं प्रमाण पाहता येत्या दहा वर्षांत राज्यातल्या काही ठिकाणी पाणी रेशनिंगवर देण्याची वेळ सरकारवर येण्याची शक्यता आहे.

 महाराष्ट्राला सध्या 2 हजार 18 टीएमसी एवढ्या पाण्याची गरज लागते. येत्या काळात राज्यातील कृषी, औद्योगिक आणि पिण्याच्या पाण्याची गरज वाढेल. ही गरज 5 हजार 707 टीएमसी एवढी असेल. उपलब्ध पाणी आणि गरज याचा मेळ घालण्यासाठी पाण्याचं रेशनिंग करावं लागेल. हे टाळण्यासाठी राज्याची सिंचन क्षमता वाढवावी लागेल. शिवाय महाराष्ट्राची भूजल पातळीही वाढवावी लागेल. त्यासाठी गाव पातळीवर उपाययोजना कराव्या लागतील.

 वीस वर्षांपूर्वी बाटलीबंद पाण्याची बाजारपेठ एवढी वाढेल याची कुणाला कल्पनाही नव्हती. त्याचप्रमाणं येत्या काळात रेशनिंगवर पाणी मिळेल ही आता वाटत असलेली कल्पनाही सत्यात उतरु शकते.

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live