आव्हान याचिकेत तथ्य, तरुण तेजपालला  नोटीस 

Tarun Tejpal
Tarun Tejpal

महिला कर्मचाऱ्यावरील लैंगिक अत्याचार sexual harassment या प्रकरणात तहलकाचे माजी संपादक Former editor of Tehelka  तरुण तेजपालला Tarun Tejpal आज मुबंई उच्च न्यायालयाच्या Bombay High Court गोवा खंडपिठाने यात “प्रथम दर्शनी तथ्य ” वाटल्याने तरुण तेजपालला Tarun Tejpal  नोटीस Notice बजावली असून त्याला येत्या 24 जून पर्यंत मुदत देण्यात आली आहे.  (Facts in challenge petition, notice to Tarun Tejpal)

उच्च न्यायालयाने असे नमूद केले आहे की, सत्र न्यायालयाचा निकाल हा लैंगिक गुन्ह्यामुळे पीडित मुलीने 'कसे वागावे किंवा कशी प्रतिक्रिया द्यावी' या सूचनाप्रमाणे दिल्यासारखे दिसते आहे. केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे आजच्या सुनावणीला हजर होते.

हे देखील पहा - 

ट्रायल कोर्टाच्या निकालामध्ये महिलांवरील गुन्ह्यांबाबत संवेदनशीलता कमी असल्याचे त्यांनी आज नजरेत आणून दिले आहे. 27 मे रोजी सत्र न्यायालयाचा 527 पानांचा निकाल उपलब्ध झाल्यानंतर उच्च न्यायालयाने गोवा सरकारला आपले सुधारित अपील दाखल करण्यास परवानगी दिली होती.

तरुण तेजपालने आपल्या कनिष्ठ महिला सहकाऱ्याने दाखल केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात निर्दोष मुक्त करण्यासाठी 21 मेच्या खटल्याच्या न्यायालयाच्या आदेशाला राज्य सरकारने उच्च न्यायालयात अपील केले होते. ही घटना नोव्हेंबर 2013 मध्ये घडली होती. सरकारने 66 पानी दुरुस्ती अर्ज सादर करून गोवा सरकारने 84 मुद्दे  मांडले आहेत. ज्यात कोर्टाचा निकाल “कायद्यात टिकाव ” धरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Edited By - Puja Bonkile 
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com