फडणवीस- महाजनांची परस्परविरोधी विधाने

सरकारनामा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

भाजप नेते गिरीश महाजन यांनी मनसेला समविचारी म्हटले आहे, तर फडणवीसांच्या मते भाजप आणि मनसेमध्ये वैचारिक साम्य नाही.

 

पुणे: राज ठाकरे यांच्या मनसेसोबतच्या संभाव्य युतीवरून भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांची परस्परविरोधी विधाने समोर आली आहेत.

चार दिवसांपासून भाजप- मनसे युतीची चर्चा सुरू आहे. त्यातच दोन दिवसांपुर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली. या भेटीबाबत काल फडणवीसांचे विश्वासू सहकारी गिरीश महाजन यांना विचारण्यात आले होते. त्यावेळी भेट झाल्याचे त्यांनी मान्य केले होते, तसेच राज ठाकरे आणि आम्ही समविचारी आहोत त्यामुळे युती होवू शकते, असे स्पष्टपणे सांगून टाकले होते, मात्र आज फडणवीस यांनी सावध भुमिका घेतली आहे.

 

 

फडणवीस या भेटीसंबंधी स्पष्टपणे काही सांगायला तयार नाहीत. राजकीय भेटीगाठी होतच असतात, यापुर्वी अनेकदा राज ठाकरे यांना भेटलो आहे, असे मोघम उत्तर फडणवीस देत आहेत. त्याबरोबरच मनसे आणि भाजपच्या विचारात भिन्नता आहे, ती दूर झाली तर युती होवू शकते, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे भाजप आणि मनसे हे समविचारी की भिन्नविचारी पक्ष आहेत, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
 

WebTittle :: Fadnavis - Contradictory statements of Mahajan

 

संबंधित बातम्या

Saam TV Live