फडणवीस सरकार काही महिन्यांपुरतेच : अशोक चव्हाण

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

मुंबई : पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. यामध्ये काँग्रेसची होणारी आगेकूच चांगली आहे. हा एक लोकशक्तीचा विजय आहे. नोटाबंदीसारख्या निर्णयाविरोधातील कौल जनतेने दिला आहे. सध्या या राज्यांत जे काही सुरु आहे, अशीच परिस्थिती महाराष्ट्रातही पाहिला मिळणार आहे. त्यामुळे फडणवीस सरकार काही महिन्यापुरतेच राहील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज (मंगळवार) सांगितले.

छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहे. या निकालावर आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण म्हणाले, पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. यामध्ये काँग्रेसची आगेकूच होत आहे. हा एक लोकशक्तीचा विजय आहे. नोटाबंदीसारख्या निर्णयाविरोधातील कौल जनतेने दिला आहे. सध्या या राज्यांत जे काही सुरु आहे, अशीच परिस्थिती महाराष्ट्रातही पाहिला मिळणार आहे. त्यामुळे फडणवीस सरकार काही महिन्यापुरतेच राहिल, महाराष्ट्रातसह असेच चित्र पाहिला मिळेल. 

Web Title: Fadnavis Government is for a few months only says Congress Leader Ashok Chavan

संबंधित बातम्या

Saam TV Live