फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल, पहा, पत्रकार परिषदेतील काही महत्वाचे मुद्दे

साम टीव्ही
मंगळवार, 26 मे 2020

संकटकाळात भाजपला राजकारणात रस नाही...ठाकरे सरकार पाडण्याची आम्हाला घाई नाही...विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य..

विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका केलीय. यासह केंद्र सरकारने राज्य रकारला पुरेपूर मदत केली, मात्र राज्य सरकारला त्याचा वापर करता आला नाही. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. 

पाहा खालील व्हिडीओत फडणवीसांनी नेमके कोणते मुद्दे मांडलेत...

हे ही पाहा-

 

संजय राऊतांचे ट्टिट 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल संध्याकाळी मातोश्रीवर भेट झाली. दोन नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली. कुणी सरकारच्या स्थिरतेबाबत बातम्यांचा धुरळा उडवीत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी, अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना सुनावले. 

कोरोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. संशोधन जारी है...विरोधकांनी तत्काळ quarantine व्हावे, हेच बरे...महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील....Boomerang..., असे म्हणत राऊत यांनी भाजपला चिमटा काढला आहे. 

राज्यात गेली दोन दिवस राजकीय घडामोडी घडत आहेत. विविध नेते राज्यपालांची भेट घेत आहेत. त्यातून राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती राजवट लागेल, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. त्याबाबतही राऊत यांनी भाष्य केले. ""राष्ट्रपती राजवटीसाठी सर्वात सक्षम केस ही गुजरातची आहे. सुरुवात तिथून व्हायला हवी. कालच गुजरात हायकोर्टानं जे निष्कर्ष काढलेत, तिथले हॉस्पिटल्स म्हणजे अंधारकोठड्या झाल्यात असं म्हटलं. त्यानंतर खरंतर तिथल्या राज्यपालांनी हालचाल करायला पाहिजे,'' असेही राऊत म्हणाले. 


संबंधित बातम्या

Saam TV Live