अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाकी , वाझेमुळं महाविकास आघाडीत बिघाडी

साम टीव्ही
गुरुवार, 11 मार्च 2021

अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाकी 
वाझेमुळं महाविकास आघाडीत बिघाडी
विरोधकांना तोंड देताना शिवसेना खिंडीत 

 

अधिवेशनात महाविकास आघाडीत एकजूट दिसली नाही. सचिन वाझे प्रकरणात शिवसेना सभागृहात एकाकी लढताना दिसली.

जेव्हा जेव्हा भाजप सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक झाली तेव्हा तेव्हा महाविकास आघाडीचे नेत्यांनी त्यांना एकीनं उत्तर दिलं. किंबहून जेव्हा महाविकास आघाडीवर टीका झाली तेव्हा आघाडी अधिकच घट्ट झाल्याचं पाहायला मिळालं. पण याला अपवाद यावेळंचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ठरलं. अंबानींच्या घराबाहेरची स्फोटकांची कार, सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांची हत्या हे प्रकरण विरोधकांना लावून धरलं. विरोधकांच्या तोफखान्याला उत्तर देताना महाविकास आघाडीत कुठंच एकवाक्यता नव्हती. उपमुख्यमंत्री अजित पवार कुठंच फ्रंटवर येऊन बोलताना दिसत नव्हते. अनिल देशमुखही हातचं राखून बोलल्यासारखं करताना दिसतायत. काँग्रेस नेते तर शिवसेनेच्या मदतीला कुठंच नव्हते. उलट नाना पटोलेंनी तर या आगीत तेल ओतल्यासारखं केलं. शिवसेनेला मात्र तसं काही झालंच नसल्यासारखं वाटतं.

आतापर्यंत विरोधकांना सत्ताधारी आघाडीची एकी तोडता आली नव्हती. वाझे प्रकरणामुळं सत्ताधाऱ्यांच्या एकीत फुटीची बिजं रोवण्यात विरोधकांना यश आल्याचं चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय.


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live