रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बोगस डॉकटरला अटक  

गोपाल मोटघरे
शुक्रवार, 28 मे 2021

पिंपरी चिंचवड मध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बोगस डॉकटरला अटक करण्यात आली आहे. अक्षय नेहरकर असं अटक करण्यात आलेल्या बोगस डॉक्टरचं नाव आहे. तो फक्त 10 वी पास असल्याचे पोलीस तापसात उघडकीस आले आहे.

पुणे - पिंपरी चिंचवड Pimpri Chinchwad मध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बोगस डॉकटरला Doctor अटक arrest करण्यात आली आहे. अक्षय नेहरकर असं अटक करण्यात आलेल्या बोगस डॉक्टरचं नाव आहे. तो फक्त 10 वी पास असल्याचे पोलीस तापसात उघडकीस आले आहे. Fake doctor arrested in Pimpri Chinchwad

अक्षय नेहरकर हा मूळचा बीड जिल्ह्यातील राहणारा असून सध्या तो चिंचवड परिसरातील बिजलीनगर येथील रहिवासी आहे. आरोपी नेहरकर याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसून तो केवळ दहावी पास आहे. असं असताना देखील त्याने पिंपरीतील एका रुग्णालयात डॉक्टर म्हणून चक्क एक वर्षभर काम केलं आहे. 

हिंदू स्मशानभूमीतील गॅस दाहिनीची नागरिकांकडून तोडफोड

मात्र त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही. एका इन्शुरन्स कंपनीत नोकरी साठी अर्ज केल असताना नेहकर याचा बनाव उघडकीस आला आहे. इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी विशाल भास्कर काटकर यांनी पिंपरी पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी नेहरकरचा भांडाफोड झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पिंपरी पोलिसांनी तातडीने पावलं उचलत आरोपी अक्षय नेहरकरला अटक केली आहे. 

Edited By - Shivani Tichkule

हे देखील पहा -

 


संबंधित बातम्या

Saam TV Live