सोनगीर पोलीसांकडून बनावट दारू तयार करणारा कारखाना उद्धवस्त

भूषण अहिरे
सोमवार, 10 मे 2021

कारवाई दरम्यान वाहनातून एका संशयिताने उडी मारून पसार होण्यात त्याला यश देखील आले होते. त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीची कसून चौकशी केली. चौकशी केली असता असता त्याने हा सर्व साठा बनावट दारू साठा असल्याचे पोलिसांना सांगितले.

धुळे: सोनगीर Songir पोलिसांनी Police गेल्या काही दिवसांपूर्वी एका स्विफ्ट कार Swift Car मधून वाहून नेणाऱ्या दारूसाठ्या सह एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या. तसेच या कारवाई दरम्यान वाहनातून एका संशयिताने उडी मारून पसार होण्यात त्याला यश देखील आले होते. त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीची कसून चौकशी केली. चौकशी केली असता त्याने हा सर्व साठा बनावट दारू साठा Counterfeit liquor stocks असल्याचे पोलिसांना सांगितले. Fake liquor factory demolished by Songir police

हे देखील पहा -

साक्री Sakri तालुक्यातील निजामपुर Nijampur या ठिकाणी जयदेव होडकर यांच्या राहत्या घरामध्ये हा बनावट दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती दिली.

या माहितीच्या आधारे सोनगीर पोलिसांनी एक पथक निजामपुर या ठिकाणी रवाना केले. या पथकाने माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा Raid टाकला. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारी सामग्री सापडली.

दुधगावचे रस्ते कोरोनाच्या चित्राने बोलू लागले

तसेच विविध कंपन्यांचे लेबल लावलेल्या बाटल्याही हस्तगत केल्या. तसेच स्पिरीटचा साठा सापडला. तसेच मोठ्या प्रमाणात तयार केलेली दारू असा एकूण तीन लाखांहून अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. 

Edited By- Sanika Gade

 

संबंधित बातम्या

Saam TV Live