पिंपरी-चिंचवड मधील बनावट आरटीपीसीआर रिपोर्ट देणारी टोळी गजाआड.... (पहा व्हिडीओ)

साम टीव्ही ब्युरो
रविवार, 2 मे 2021

कोरोना अहवाल चा निकाल काय येतो यावर जीवन मरणाचा प्रश्न आहे. परंतु आता रिपोर्ट मध्ये सुद्धा बनवटगिरी सुरु झाली आहे. पुण्यात पिंपरी चिंचवड मध्ये अश्याच एक टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवड: कोरोना चाचण्या जास्तीत जास्त व्हाव्यात यासाठी  पॅथॉलॉजी लॅब आहेत. याद्वारे RTPCR चाचणी किंवा रॅपिड टेस्ट Rapid test केल्या जातात. कोरोना अहवालचा निकाल काय येतो यावर जीवन मरणाचा प्रश्न आहे. परंतु आता रिपोर्ट मध्ये सुद्धा बनवटगिरी सुरु झाली आहे. पुण्यात पिंपरी चिंचवड मध्ये अश्याच एक टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे.  A fake RTPCR report giving gang was found in Pimpri Chinchwad

पुण्यातील पिंपरी-चिंचवडच्या पोलिसांनी बनावट RTPCR टेस्ट करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांचे बनावट रिपोर्ट तयार करून देत होती. ह्या बनवटगिरीची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीचा पुढील तपास केला असता या टोळीने ६२ कामगारांचे बनावट रिपोर्ट तयार केल्याची धक्कादायक बाब समोर अली आहे.

या आरोपींना सध्या पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे. तरी अटक करण्यात आलेले आरोपी हे उच्चशिक्षित आहेत. हे तीनही आरोपी चिखली परिसरातील समर्थ पॅथॉलॉजी या नावाने लॅब चालवत होते. बळीराम लोंढे, बिरूदेव वाघमोडे, सुरज लोंढे अशा तीन आरोपींची नावे आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी हे सातशे रुपयेला एक बनावट RTPCR टेस्ट रिपोर्ट तयार करून देत होते. या टोळीकडून पोलिसांनी आता ६२ बनावट RTPCR टेस्ट रिपोर्ट आणि  तयार करण्यासाठी लागणारे कम्प्युटर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. 

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live