"माझ्यावर खोटे आरोप केले गेले : अभिनेता करण मेहरा यांचे जामिनानंतर स्पष्टीकरण

Karan Mehra and Nisha Rawa
Karan Mehra and Nisha Rawa

'ये रिश्ता क्या कहलाता है' Yeh Rishat Kya kehlata Hai या टीव्ही मालिकेच्या TV series माध्यमातून करण मेहरा घरोघरी पोहोचला. करण मेहरा Karan Mehra विरोधात त्याची पत्नी अभिनेत्री निशा रावलनेActress Nisha Rawal घरगुतू हिंसाचारा प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात police station  तक्रार केली होती. त्याला गोरेगाव पोलिसानी police  अटक केली होती.

काही वेळातच करणला जामिनावर Bail सुटका झाली. परंतु जामिनावर Bail सुटका झाल्यानंतर टीव्ही TV अभिनेता करण मेहरा यांनी एका मुलाखतीत Interview म्हंटले आहे की, पत्नी आणि अभिनेत्री निशा रावलनी "तिचे डोके भिंतीवर फोडले "आणि पुढे तिच्या भावाने मला मारहान केली." करण पुढे म्हणाला की निशाने त्याच्यावर अत्याचार केले आणि त्यावर थुंकले. 

हे देखील पहा - 

एका वेबसाइटला दिलेल्या, मुलाखतीनुसार करणने त्याच्या आणि निशाच्या नात्यात दुरावा येण्याचे कारण तसेच वैवाहिक आयुष्यत भांडण का होऊ लागले याबद्दल माहिती दिली. तो म्हणाला की मागील बऱ्याच काळापासून यांच्यामध्ये भांडण सुरू आहे. हे भांडण सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करत होतो. निशा आणि मी यांच्या भांडण संपवण्याचा प्रयत्न करत होतो.  तसेच तिचा भावू रोहित ढेकिल आम्हाला मदत करत होता. काल रात्रीच तो आमच्या घरी अल होता. तेव्हा त्याने निशासह माझ्याकडे पोटगीसाठी एक मोठी रक्कम मागितली. परंतु मला ती रक्कम देणे शक्य नसल्याच  मी त्यांना  सांगितले. त्यावर रोहिटणे तिला कायदेशीर मार्गाचा वापर करण्यास सांगितले.  

करण मेहरा पुढे म्हणाला, 'मी कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यास तयार होतो. मी माझ्या आई वडिलांशी बोलण्याकरीता माझ्या खोलीत गेलो. तेव्हा निशा सुद्धा तिथे आली आणि मला , माझ्या आई-वडील आणि भाऊ यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ती माझ्यावर थुंकली. मी तिला बाहेर जाण्यास सांगितले तेव्हा तिने मला धमकी देण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिनं स्वतःचं डोकं भिंतीवर आपटले आणि हे सर्व मी केल्याचं सर्वांना सांगितलं.
 

तो म्हणाला 'मी तिला हातही लावला नाही . मला खोट्या आरोपात फसवलं जात आहे. मी तिला मारहाण केलीच नाही. निशा आणि तिच्या भावानं मला मारहाण केली. त्यांनी मला छातीवर मारलं. मी तिच्या भावाला समजावत होतो की, मी काहीही केलेलं नाही. खात्रीकरिता  सीसीटीव्ही फुटेज पाहा. पण जेव्हा सीसीटीव्ही फुटेज पाहिलं तेव्हा कॅमेरा बंद  होते. त्यांनी हे सर्व प्लान करत कॅमेरा बंद करून मला मारहाण केली. त्यानंतर त्यांनी व्हिडीओ रेकॉर्ड करत पोलिसांना बोलवले परंतु त्यांनी काही कारवाई केली नाही. कारण त्यांना हकीकत माहीत होती . जर माझी खोटी तक्रार केली आहे तर उद्या चौकशीनंतर सत्य बाहेर येणारच आहे.

Edited By - Puja Bonkile 
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com