फनी चक्रीवादळाचा जोरदार फटका, 13 लाखांहून अधिक लोकांचे स्थलांतर

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 मे 2019

तामिळनाडू : सर्वाधिक घातक असे भाकित वर्तविण्यात आलेले ‘फनी’ चक्रीवादळ ओदिशातील पुरीच्या किनारपट्टीला धडकले आहे.  या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. ओदिशाच्या गोपालपूर, पुरी, चांदबाली, बालासोर आणि अन्य भागांमध्ये सोसायटयाच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. आतापर्यंत १० लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. फनी वादळ ओडिशाच्या पूर्व किनारपट्टीवर धडकलंय. आज कोणत्याही क्षणी हे वादळ धडकण्याची शक्यताय. दरम्यान पुरीमध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढलाय. 

याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून लाखो नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय.. तर अनेक ठिकाणी नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आलाय. 
आश्चर्यकारक बाब म्हणजे फनी वादळ अजून धडकायचंय. मात्र त्याआधीच धडकी भरवणारी दृष्य ओडिशातून समोर येताएत. वादळापूर्वी सोसाट्याच्या वाऱ्यानं कहर केलाय. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली आहेत, तर घरांच्या छताचंही नुकसान झाल्याची माहिती समोर येतेय.

ओडिशासह आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालला फनीचा फटका बसण्याचा अंदाज आहे.आज संध्याकाळपर्यंत सुमारे ताशी 170 ते 180 किमी वेगाने वादळ धडकू शकतं.वादळाचा सर्वाधिक फटका ओडिशातील 13 जिल्ह्यांमधील अकरा लाख लोकांना असुन, त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलंय. फनीच्या तडाख्याचा सामना करण्यासाठी NDRFची 81 पथकं  ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागांत तैनात करण्यात आलेत.तसंच गेल्या दोन दिवसात शंभराहून अधिक रेल्वेगाड्यासुद्धा रद्द करण्यात आल्यात.

WebTitle : fani cyclon became more dangerous, 13 lakh people shifted...

संबंधित बातम्या

Saam TV Live